आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In The Next 18 Months, 14 Judges, Including The Chief Justice Of The Supreme Court, Will Retire

नियुक्ती:पुढील 18 महिन्यांत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसह 14 न्यायमूर्ती निवृत्त होणार

संजीव शर्मा | जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुप्रीम कोर्टात मंजूर ३४ पदे, सध्या ३२ न्यायमूर्ती नियुक्त, सध्याचे कॉलेजियमही बदलणार

देशातील सर्व उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींची नियुक्ती, बदली करण्याची शिफारस करणाऱ्या सरन्यायाधीशांसह कॉलेजियमचे(न्यायवृंद) ५ वरिष्ठ जज ५ महिन्यांत निवृत्त होतील. त्यांच्या निवृत्तीनंतर सुप्रीम कोर्टाचे सध्याचे कॉलेजियम बदलले जाईल. सध्या सीजेआय एन.व्ही.रमणांसह कॉलेजियममध्ये समाविष्ट न्या. यू.यू.ललित आणि न्या. ए.एम. खानविलकर २०२२ मध्ये निवृत्त होत आहेत. यामुळे नोव्हेंबर २०२२ नंतर कॉलेजियमच्या तीन वरिष्ठ न्यायमूर्तींच्या जागी नव्या सरन्यायाधीशासह अन्य न्यायमूर्तींची नियुक्ती होईल. मात्र, सीजे रमणांच्या निवृत्तीनंतर न्या.ललित सीजे झाल्यास ते या पदावर अडीच महिने राहतील.

न्या. एन. व्ही. रमणा यांची निवृत्ती २६ ऑगस्ट २०२२, न्या.उदय ललित यांची ८ नोव्हेंबर २०२२ व न्या. ए. एम. खानविलकर यांची २९ जुलै २०२२ रोजी आहे. याशिवाय न्या. इंद्रा बॅनर्जी २३ सप्टेंबर २०२२ आणि न्या. हेमंत गुप्ता १६ ऑक्टोबरला निवृत्त होतील.