आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In The War Against Corona, The Indian Army Became An Example, 99 Percent Of The Soldiers Were Vaccinated, Out Of Which 82% Had Both Dosages; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैन्यात संक्रमनाचा दर शून्य:कोरोनाच्या लढाईत भारतीय सैन्य ठरले उदाहरण; सैन्यांमध्ये 99% लसीकरण, 82% सैनिकांचे दोन्ही डोस पूर्ण

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वीलेखक: मुकेश कौशिक
  • कॉपी लिंक
  • पटनामध्ये 500, वाराणसीत 750 आणि अहमदाबाद 300 बेड्सचा हॉस्पिटल

एकीकडे संपूर्ण जग कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने त्रस्‍त आहे. जगातील अनेक देश कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरत आहे. दरम्यान, भारतीय सैन्य कोरोनाच्या लढाईत एक उदाहरण म्हणून समोर येत आहे. विशेष म्हणजे भारतीय सैन्यात कोरोना संसर्गाचा दर शून्य आहे. आतापर्यंत भारतीय सैन्यांचे 99 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून यामधील 82 टक्के सैनिकांनी दोन डोस घेतले आहे. भारतीय सैन्यांने हे काम दोन महिन्याच्या आत करुन दाखवले आहे. त्यामुळे भारतीय सैन्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

सैन्यांच्या सुत्रांनी दिव्य मराठीला सांगितले की, देशात दररोज 3 ते 3.25 लाखांच्यादरम्यान कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. परंतु, याचा विचार केल्यास सैन्यांत रोज 50 ते 60 प्रकरणे समोर येत आहे. कोरोनाबाधितांमध्ये ते लोक आहेत जे आपल्या कुटुंबासोबत बाहेर राहत आहे.

11.5 लाख सैनिकांना दुसरा डोस
भारतीय सैन्यांत लसीकरणाची सुरुवात 20 एप्रिलपासून करण्यात आली असून आतापर्यंत 14 लाख सैनिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामधील जवळपास 82 टक्के म्हणजे 11.5 लाख सैनिकांचे दुसरे डोस पूर्ण झाले आहे. दरम्यान, सध्या भारतीय सैन्यांतील 400 सैनिक आयसोलेशनमध्ये असून ते लवकरात लवकर रिकव्हर होणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

बेस हॉस्पिटलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतरण
भारतीय सैन्यांचे लसीकरण झाल्यानंतर दिल्लीतील बेस हॉस्पिटलचे कोविड सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आले. दरम्यान, सध्या येथे ऑक्सिजन सुविधेसह 258 बेड्स असून यामध्ये रुग्ण उपचार घेत आहे. विशेष म्हणजे भारतीय सैन्यांनी 1000 बेड्स असणारा हॉस्पिटलदेखील सामान्य लोकांसाठी खुले केले आहेत.

पटनामध्ये 500, वाराणसीत 750 आणि अहमदाबाद 300 बेड्सचा हॉस्पिटल
भारतीय सैन्यांचे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपआपले हॉस्पिटल आहेत. परंतु, भारतीय सैन्यांने पटनामध्ये 500, वाराणसीत 750 आणि अहमदाबाद 900 बेड्सचा हॉस्पिटलचे माजी सैनिकांसाठी आणि सर्वसामान्य लोकासांठी उपलब्ध केले आहेत. दरम्यान, यामधील बेड्सची संख्या गेल्या सात दिवसांत दुप्पटीने वाढवली आहे.

बातम्या आणखी आहेत...