आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In This School, Normal Children Along With The Disabled Also Know Braille sign Language, An Initiative To Increase Sensitivity Among Children.

प्रयोग:या शाळेमध्ये दिव्यांगांसोबत सामान्य मुलेही  ब्रेल-सांकेतिक भाषा जाणतात,मुलांमध्ये संवेदनशीलता वाढवण्यासाठी पुढाकार

राजीव शर्मा | खरगोन (मप्र)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे दृष्टिहीन मुले हातवारे करून बोलतात. मतिमंद मुले सूर्यनमस्काराची कठीण आसने करताना दिसतात. हे शक्य झाले आहे मप्रतील खरगोन येथील आस्था ग्राममध्ये. येथील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य मुलांसोबत गरीब आदिवासी कुटुंबातील मतिमंद, मूकबधिर, अपंग, श्रवणदोष असलेले व दृष्टिहीन मुलेही शिकतात. अभ्यास, परीक्षा, खेळणे, वसतिगृहात राहणे-खाणेही सोबतच होते. सामान्य व दिव्यांग मुलांमध्ये कोणताच भेदभाव नाही. सर्व मुलांसाठी एकच शिक्षक, एकच अभ्यासक्रम आणि एकाच परीक्षेचा नियम आहे. संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर (मेजर) अनुराधा सांगतात, अशा प्रकारे शिकवणारी ही शाळा देशातील अनोखी व पहिली आहे. येथील मुलांमध्ये क्षमता विकसित झाली आहे. सांकेतिक भाषेत मूकबधिर बोलतातच, पण मतिमंद-दृष्टिहीनही ती चांगल्या प्रकारे जाणतात. ब्रेल लिपीद्वारे दृष्टिहीनच नाही, तर मूकबधिरही न थांबता लिहितात. सामान्य मुलेही ब्रेल लिपी, सांकेतिक भाषा जाणतात. आस्था ग्राममध्ये झाडे-वनस्पती, वसतिगृह, खेळाचे मैदान, स्वच्छतागृहापासून ते वर्गखोलीपर्यंत प्रत्येक गोष्ट थीमवर आधारित आहे. मुलांना स्वावलंबी व पर्यावरणाबाबत संवेदनशील बनवण्याचे शिक्षण येथे दिले जाते. याशिवाय व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.

अनुराधा सांगतात, ‘मुलांमध्ये काही कमतरता असल्या तरी काही गुणही असतात. संस्थेत आम्ही सर्वसमावेशक शिक्षण (सामान्य व दिव्यांगांसोबत शिक्षण) सुरू केले तेव्हा हा प्रयोग यशस्वी होणार नाही, असे लोकांना वाटत होते. मात्र, आम्हाला यश मिळाले. दिव्यांगांसोबत राहिल्याने, शिक्षण घेतल्याने सामान्य मुलांतही नेतृत्व क्षमता, संवेदनशीलता व मदतीची भावना विकसित होत आहे.

गुणांद्वारे मुलांची होते ओळख दिव्यांग मुलांत काही उणिवा असतात. त्यामुळे उणिवांऐवजी त्यांच्यातील गुणांमुळे ओळखण्यासाठी त्यांना विशेष नाव देण्यात आले. जसे गरुड पक्षी तीक्ष्ण दृष्टी व एकाग्रतेसाठी ओळखला जातो. मूकबधिर बोलू-ऐकू शकत नाहीत. त्यामुळे एकाग्रता अधिक असण्यासह त्यांची अवलोकन क्षमताही अधिक असते. त्यामुळे त्यांचे नाव गरुड ग्रुप ठेवण्यात आले. मानसिकदृष्ट्या दिव्यांग मनाने चांगले असतात. म्हणून या मुलांच्या गटाला हृदय ग्रुप असे नाव दिले. सामान्य मुलांना सार्थक ग्रुप नाव दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...