आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In This Village Of Tamil Nadu, No Candidate Has Been Allowed To Campaign For 3 Generations, Flags, Poster Banners Or Loudspeakers Are Not Installed In Any House.

एक गाव असेही:तामिळनाडूमधील या गावात 3 पिढ्यांपासून कोणत्याही उमेदवाराला प्रचाराला परवानगी नाही, कोणत्याही घरावर झेंडा, पोस्टर-बॅनर किंवा लाउडस्पीकरदेखील नाहीत

सुनील बघेलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओथविडू हे मदुराईपासून 20 किमी अंतरावर असलेले एक छोटेसे गाव आहे, जिथे कोणत्याही उमेदवाराला प्रचाराची परवानगी नाही.

तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळते. परंतु या राज्यात मदुराई जवळील एक असे गाव आहे, जिथे तीन पिढ्या देशातील पहिल्या निवडणुकीपासून ते आजवर कोणत्याही उमेदवाराला प्रचाराची परवानगी दिली नाही. इतकेच नाही तर या गावात कोणत्याही नेत्याला गावातील वेशीवर, येथील घरांवर झेंडे, बॅनर, पोस्टर्स आणि कटआउट्स लावण्याचीही परवानगी नाही. शिवाय तामिळनाडूच्या निवडणूक संस्कृतीचा भाग बनलेल्या कॅश फॉर वोटलाही येथे स्थान नाही. उमेदवार कोणताही असो, त्याला गावाच्या सीमेवरुनच परत पाठवले जाते.

ओथविडू जवळील दुसर्‍या गावात निवडणुक प्रचार सुरु आहे. मात्र येथे शांतता आहे.
ओथविडू जवळील दुसर्‍या गावात निवडणुक प्रचार सुरु आहे. मात्र येथे शांतता आहे.

मदुराईपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले ओथविडू हे एक लहान गाव आहे. तिथे 200 घरे आणि गरीब 600 मतदार आहेत. गावातले बहुतेक गावकरी हे 100 वर्षांपूर्वी तिरुमंगलमहून स्थलांतरीत झालेल्या तीन कुटुंबांचे वंशज आहेत. या खेड्याच्या दोन्ही बाजूंनी 1 किलोमीटरच्या परिघात इतर गावेही आहेत. दोन्ही बाजूंनी प्रसिद्धीचा आवाज आणि पक्षांच्या पोस्टर-बॅनर आणि निवडणुकीच्या चिन्हांनी सजवलेल्या भिंतीही आहेत. ढोल-ताषे आणि फटाके वाजवण्याची परंपरा प्रचाराच्या काळातही सुरू आहे, परंतु ओथविडू गावात प्रवेश करताच वातावरण पूर्णपणे बदलेले दिसत आहे.

गावाच्या बाहेरच प्रचारासाठी येणार्‍या नेत्यांचे स्वागत केले जाते आणि तेथूनच त्यांना परत पाठवले जाते.
गावाच्या बाहेरच प्रचारासाठी येणार्‍या नेत्यांचे स्वागत केले जाते आणि तेथूनच त्यांना परत पाठवले जाते.

सध्या येथे दिनाकरन यांचा पक्ष एएमएमकेच्या उमेदवाराच्या पारंपरिक स्वागतासाठी तयारी सुरु आहे. प्रचारासाठी वाहन गावात प्रवेश करताच लाऊडस्पीकर बंद करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणूकीपासून ही परंपरा येथे चालत असल्याचे येथील रहिवासी पंडी यांचे म्हणणे आहे. तामिळनाडूमध्ये अंत्यसंस्कारावेळीदेखील ढोल-ताशे आणि फटाके वाजवण्याची परंपरा आहे. मात्र ओथविडूमध्ये यास परवानगी नाही. इथे चित्रपट कलाकारांचेही वेड आहे पण चित्रपटांचे पोस्टर्स दिसत नाहीत. प्रसिद्धीपासून दूर राहण्याचे कारण विचारले असता पंडी म्हणतात- पक्षांचा प्रचार आणि भाषण यामुळे परस्पर वाद वाढतात. गावाची एकता आणि सौहार्द आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

सुमारे 600 लोकसंख्या असलेले ओथविडू एक लहानसे गाव आहे.
सुमारे 600 लोकसंख्या असलेले ओथविडू एक लहानसे गाव आहे.

म्हणून आम्ही प्रत्येक उमेदवारांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करतो. गावाच्या सीमेवर ते त्यांच्या समस्या सांगतात, त्यांचे ऐकतात. आमच्या ही परंपरा राजकीय पक्षांनाही माहित आहे आणि ते त्याचा आदर करतात. मुरुगनच्या घरात डोकावल्यानंतर 'कलाइगनर (करुणानिधी) टीव्ही' देखील दिसतो आणि 'अम्मा फॅन' देखील दिसतो. मुरुगन म्हणतात- आम्हाला निवडणुकांपासून कोणतीही अडचण नाही. आम्ही सर्वजण कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संबंधित आहोत, पण आम्ही प्रचार करत नाही, मतांसाठी पैशांना परवानगी नाही. अशी आणखी काही गावे मदुराईससह तेनी आणि विरुधुनगर जिल्ह्यातही आहेत. जेथे निवडणुका नंतरच्या भांडणांमुळे 80 च्या दशकापासून गावक-यांनी असेच निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...