आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धार्मिक पुस्तकांसाठी जगात प्रसिद्ध गीता प्रेसमध्ये काम केलेले मेघसिंह चौहान यांनी गेल्या दोन वर्षांत ३३५ धार्मिक ग्रंथ आणि पुस्तके डिजिटल केली आहेत. जोधपूरचे रहिवासी मेघसिंह चौहान गीता प्रेसमध्ये २५ वर्षे गोरखपूरमध्ये सहायक व्यवस्थापक होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी गीता प्रेसच्या पुस्तकांना ई- बुकमध्ये रूपांतरित करण्याचा निश्चय केला. संस्थेत नोकरी करताना हे शक्य होत नसल्याने त्यांनी २०१७ मध्ये गीता प्रेसची नोकरी सोडून दिली. नोकरी सोडल्यानंतरही त्यांना अनेक ठिकाणांहून महिन्याला लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर आली. मात्र, त्यांनी नकार दिला. तरुणांच्या हातात असलेल्या मोबाइलमध्ये युवा पिढीला संस्कार देणाऱ्या काही गोष्टी उपलब्ध करून देणे हा एकच हेतू होता. जोधपूरला परतल्यावर २०१८ पासून त्यांनी गीता प्रेसची पुस्तके डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम सुरू केले.
यासाठी गीता सेवा ट्रस्ट अॅप तयार करण्याबरोबरच वेबसाइट, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर आणण्याचे काम सुरू केले. यासाठी लोकांच्या मदतीने गीता सेवा ट्रस्ट बनवला आणि अवघ्या दोन वर्षांत ३३५ धार्मिक पुस्तकांना हिंदी- इंग्रजीत ई- बुकमध्ये रूपांतरित केले. सध्या साडेतीन लाख जण डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहेत. आता कन्नड, तामिळ, बंगालीसह प्रादेशिक भाषांमध्ये धार्मिक पुस्तकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी काम सुरू आहे. २०२१च्या अखेरपर्यंत बहुतांश प्रादेशिक भाषांमध्ये गीता प्रेसची पुस्तके उपलब्ध असतील, तिही मोफत. सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक पुस्तक वाचण्याबरोबरच प्रत्येक शब्दाचा शुद्ध उच्चारही ऐकता येईल.
गीता ट्रस्ट गोरखपूरचे विश्वस्त ईश्वर प्रसाद पटवारी सांगतात की, गीता प्रेस आणि गीता सेवा ट्रस्ट दोन्ही वेगळ्या संस्था आहेत. मात्र, दोघांत कोणताही वाद नाही. गीता प्रेस डिजिटल प्लॅटफॉर्मवर येऊ शकत नसल्याने गीता सेवा ट्रस्ट हे काम करत आहे.
स्कॅन करण्याऐवजी प्रत्येक शब्द टाइप केला
मेघसिंह सांगतात की, त्यांना वाचण्यासाठी पुस्तकांना धार्मिक पद्धतीने जतन करावी लागते. हजारो पानांची पुस्तके सहज वाचता येतात, यासाठी स्कॅन करण्याऐवजी प्रत्येक शब्द टाइप करण्यात आला. ५० जणांनी रात्रंदिवस काम केले. लोकांच्या मदतीने गीता सेवा ट्रस्ट स्थापन केला आणि गीता प्रेसची बहुतांश पुस्तके आज एका अॅपवर मोफत ऑनलाइन उपलब्ध आहेत. इतर भाषांसाठी आजही लोक घरातूनच काम करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.