आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Uttar Pradesh, In Addition To 5,000 Villages, Local Incomes Have Changed | Marathi News

आदर्श गाव अभियान / विजय उपाध्याय:उत्तर प्रदेशात 5 हजार गावांत स्थानिक उत्पन्नावर भर, गावांचे रूप पालटले

लखनऊ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रूप पालटलेले थरौली गाव. - Divya Marathi
रूप पालटलेले थरौली गाव.

उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरच्या सहोरा गावात आता ग्रामसभा घेतली जाते. त्यामुळे कोणत्याही गावकऱ्यास सल्ला देता येऊ शकतो. या बैठकांत कामाचा प्राधान्यक्रम निश्चित केला जात आहे. मुलींचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या मातांचा गौरव केला जातो. गावातील रोजगारक्षम लोकांची माहिती ठेवली जाते. गरजूंना मनरेगाअंतर्गत गावातच रोजगार देण्याची व्यवस्था केली जाते. सहारनपूरच्या थरौलीमध्ये तर संपूर्ण लक्ष आरोग्य व शिक्षणावर केंद्रित करण्यात आले आहे. गावाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पर्यटन म्हणून ते विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाव एलईडीच्या प्रकाशात न्हाऊन गेले आहे. डेंग्यूसारख्या आजारांपासून बचावासाठी जनतेच्या सहकार्यातून फवारणी तसेच इतर गोष्टींवर भर दिला आहे. म्हणूनच गावात रोगराई दिसत नाही. अशा प्रकारचे परिवर्तन उत्तर प्रदेशातील पाच हजार गावांतून दिसून येत आहे. त्याचा मुख्य आधार ठरला ते ‘मॉडेल गावाचे अभियान’. हेच अभियान या गावांनी अमलात आणले. लवकरच आणखी ३५०० गावे अभियान राबवतील. ही योजना पक्षांच्या जाहीरनाम्यासारखी नाही. कारण याेजनेच्या अंमलबजावणीत गावकरी सक्रिय आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्याची चावी गावातच आहे. नवीन गरजा व तंत्रज्ञानाच्या साह्याने गावाचा कायापालट केला जात आहे. हाच या अभियानामागील उद्देश आहे. सनदी अधिकारी हिरालाल म्हणाले, आदर्श गावाची कल्पना मला बांदाचा डीएम असताना सुचली होती. त्यानंतर ग्रामस्थांना राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजारला पाठवले. त्यानंतर गावकऱ्यांना हे काम अतिशय सुकर असल्याचे लक्षात आले.

टीममध्ये नोकरशहा, शिक्षणतज्ञ, उद्योजकही
सनदी अधिकारी हिरालाल यांनी अभियानासाठी पुढाकार घेतला. त्यांच्यासमवेत एकेटीयूचे माजी कुलगुरू प्रो. कृपाशंकर, रिव्हरसाइड युनिव्हर्सिटी कॅलिफोर्नियाचे प्रो. आर.के.सिंह, इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे असोसिएट्स डॉ. सिद्धार्थ शेखर सिंह, आयआयएम लखनऊचे प्रो. देवाशिष दासगुप्तांसारखे व्यक्ती सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...