आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Uttar Pradesh, Uttarakhand, Goa And Manipur, The BJP Won A Clear Majority In The 4th Assembly Elections|Marathi News

महा-राजयोग:उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 4 विधानसभा, निवडणुकीमध्ये भाजपने मिळवले स्पष्ट बहुमत

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीपूर्वी बरोबर दोन वर्षे आधी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ४ विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने बादल पिता-पुत्र, मुख्यमंत्री चन्नी, सिद्धूसारख्या ‘खास’ नेत्यांना धूळ चारून ऐतिहासिक विजय मिळवला. अापला ४२ टक्के मते मिळाली. सन १९९२ नंतर हा उच्चांक आहे. आता प्रादेशिक पक्ष असलेला आप दोन राज्यांत सत्तारूढ होणार आहे. यापूर्वी अण्णा द्रमुकने हा चमत्कार केला आहे.यूपीत भाजपच्या ५७ जागा घटल्या. मात्र मतांचा हिस्सा १.३ टक्के वाढला. माता-भगिनी भाजपच्या विजयरथाच्या सारथी आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.तर दुसरीकडे पंजाबमधील विजयावर प्रतिक्रिया देताना ही क्रांतीची मशाल आता देशभर प्रज्वलित करू, असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.

१७ राज्यांत भाजपची सत्ता; यूपीत कार्यकाळ पूर्ण करून सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे योगी ७१ वर्षांतील पहिलेच नेते

पंजाब : आपचा ‘झाडू़’ असा फिरला की काँग्रेसचे १७ पैकी १० मंत्री पराभूत
पंजाबमध्ये ‘आप’ने विक्रम केले. पहिला - ५६ वर्षात ९० पेक्षा अधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. दुसरा- मुख्यमंत्री चन्नी यांचा दोन्ही जागांंवर पराभव करणारे आपचे उमेदवार प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले होते. तिसरा- ३० वर्षांत प्रथमच बादल कुटुंबीयांपैकी एकही व्यक्ती विधानसभेत नसेल. बादल पिता-पुत्रांना ‘आप’ च्या उमेदवारांनी पराभूत केले.

बातम्या आणखी आहेत...