आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In Vidisha, Negligence In Carrying The Bodies Of The Infected, The Dead Body Fell On The Road In The Middle Of The Running Dead Vehicle, Stirred Up

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृतदेहाची विटंबना:धावत्या गाडीतून रस्त्यावर पडला कोरोना संक्रमिताचा मृतदेह, काही दिवसांपूर्वी जिवंत व्यक्तीला मृत घोषित केले होते

विदिशा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदिशा मेडिकल कॉलेजच्या वाहनातून मृतदेह रस्त्यावर पडला

मध्यप्रदेशातील विदिशा मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहांची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना संक्रमितांचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या धावत्या गाडीतून मृतदेह रस्त्यावर पडला. मृतदेह पडल्याचे पाहिल्यानंतर रस्त्यावरील लोकांनी आवाज देऊन गाडी चालकाला थांबवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनात दोन मृतदेह ठेवता येतात. पण, या गाडीत तीन मृतदेह ठेवले होते. यावेळी धावत्या गाडीतून एक मृतदेह रस्त्यावर पडला. मृतदेह रस्त्यावर पडल्यानंतर काही लोकांनी वाहन चालकाला थांबवले आणि नंतर मृतदेह गाडीत ठेवून स्मशानभूमीकडे नेण्यात आला.

याच हॉस्पीटलमध्ये जिवंत व्यक्तीला दोनवेळा मृत सांगितेले

विदिशाच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमधून यापूर्वीही धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 एप्रिलला संशयित कोरोना रुग्णाला दोनवेळा मृत घोषित केले होते. कुटुंबियांना मृत्यू प्रमाणापत्रही दिले होते. कुटुंबिय अंत्यविधीची तयारी करू लागले, तेव्हा हॉस्पिटलमधून फोन आला, तुमचा पेशंट जिवंत आहे.

बातम्या आणखी आहेत...