आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:माेदींच्या हस्ते 8 राेजी सेंट्रल व्हिस्टा अॅव्हेन्यूचे उद्घाटन

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा अॅव्हेन्यू सामान्य जनतेसाठी पुढील आठवड्यात सुरू हाेऊ शकते. विजय चाैकातून इंडिया गेटपर्यंत नूतनीकरण झालेल्या सेंट्रल व्हिसा अॅव्हेन्यूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते ८ सप्टेंबर हाेण्याची शक्यता आहे. हे ठिकाण आता लाेकप्रिय सार्वजनिक ठिकाणांमध्ये समाविष्ट झाले आहे.

अॅव्हेन्यूमध्ये पादचाऱ्यांसाठी लाल ग्रेनाइटचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या चाेहीबाजूने हिरवळ आहे. त्याचे क्षेत्रफळ १.१ लाख चाैरस मीटर आहे. राजपथावर १३३ पेक्षा जास्त पथदिवे, ४ हजार ८७ झाडे, ११४ आधुनिक संकेतक व अनेक बागाही आहेत. येथे ९०० हून जास्त पथदिवे आहेत. ८ सुविधा पथ तयार करण्यात आले.सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास याेजनेअंतर्गत एक त्रिकाेणीय संसद भवन, केंद्रीय सचिवालय, तीन किमी लांब राजपथावर पुनर्विकास, पंतप्रधानांसाठी निवासस्थान, कार्यालय, उपराष्ट्रपतींसाठी नवे भवनही साकारले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...