आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Inauguration Of Pragati Maidan Underpass In Delhi, Pm Modi Picked Up A Plastic Bottle From The Tunnel

PM मोदींनी दिला स्वच्छतेचा संदेश:दिल्लीतील प्रगती मैदान अंडरपासचे उद्घाटन, बोगद्यातील प्लास्टिकची बाटली स्वतः उचलली

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या मुख्य बोगद्यासह पाच बोगद्यांचे उद्घाटन केले. या बोगद्यामुळे ३० मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार असून त्यामुळे दिल्लीकरांना ट्राफिक जामपासून दिलासा मिळणार आहे. यावेळी उद्धाटन समारंभ सुरू होण्यापूर्वी एक विचित्र घटना घडली.

उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी या बोगद्यातून कार्यक्रमस्थळी पोहोचले. बोगद्यातून येताना ते काही मिनिटे चालत आले. यावेळी बोगद्यात पडलेली प्लॅस्टिकची बाटली त्यांनी स्वतः उचलून डस्टबिनमध्ये टाकली.

कोरोनामुळे बोगदा बांधण्यात लागला वेळ

आपल्या भाषणात मोदी म्हणाले - इतक्या कमी वेळात हा कॉरिडॉर तयार करणे सोपे नव्हते. हा कॉरिडॉर ज्या रस्त्यांच्या आजूबाजूला बांधला आहे ते दिल्लीचे सर्वात वर्दळीचे रस्ते आहेत. या सर्व अडचणींमध्येच कोरोना आला. पण, हा नवा भारत आहे. तो प्रश्नांचे समाधानही करतो, नवीन संकल्पही घेतो आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करतो.

न्यायव्यवस्थेचा दरवाजा ठोठावणारेही कमी नाहीत

'आज दिल्लीला केंद्र सरकारकडून आधुनिक पायाभूत सुविधांची अतिशय सुंदर भेट मिळाली आहे.' मात्र यावेळी उपहासात्मक स्वरात बोलतांना ते म्हणाले, 'अशा गोष्टी केल्या तर न्यायव्यवस्थेचे दरवाजे ठोठावणारेही कमी नाहीत'. पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'दशकापूर्वी प्रगती मैदान भारताची प्रगती, भारतीयांची क्षमता, भारताची उत्पादने, आपली संस्कृती दर्शविण्यासाठी बांधण्यात आले होते. त्यानंतर भारत बदलला, भारताची क्षमता बदलली, गरजा अनेक पटींनी वाढल्या, पण प्रगती मैदानाची फारशी प्रगती अजूनपर्यंत झालेली नाही.

नरेंद्र मोदी बोगद्याच्या आत जात असताना त्यांना प्लास्टिकची बाटली दिसली, जी त्यांनी स्वतः उचलून डस्टबिनमध्ये टाकली.
नरेंद्र मोदी बोगद्याच्या आत जात असताना त्यांना प्लास्टिकची बाटली दिसली, जी त्यांनी स्वतः उचलून डस्टबिनमध्ये टाकली.

पुढे पीएम म्हणाले की, हा नवा भारत आहे. हा समस्या सोडवतो. नवनवीन संकल्पही घेतो आणि त्या संकल्पांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणाले की, भारत सरकार देशाच्या राजधानीत जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा, प्रदर्शन हॉल उपलब्ध करून देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. दशकापूर्वी भारताची प्रगती, क्षमता, उत्पादने, आपली संस्कृती दर्शविण्यासाठी प्रगती मैदान बांधण्यात आले होते. त्यानंतर भारत बदलला, भारताची क्षमता बदलली, गरजा अनेक पटींनी वाढल्या, पण प्रगती मैदानाची फारशी प्रगती झाली नाही.

अर्ध्या तासाचा प्रवास पाच मिनिटांत पूर्ण होईल

या नव्याने बांधण्यात आलेल्या बोगद्यामुळे मेरठ एक्स्प्रेस वेने इंडिया गेटकडे जाणाऱ्या लोकांचा मार्ग सुकर होणार आहे. सहा पदरी प्रगती मैदान बोगदा सुरू झाल्याने रिंगरोड आणि इंडिया गेटवरील वाहतूक सिग्नलमुक्त होणार आहे. प्रवासाचा हा भाग तीस मिनिटांऐवजी अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण होईल. त्यामुळे प्रगती मैदानाजवळील सर्व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होणार आहे. या रस्त्यांवरून जाणाऱ्या लाखो वाहनचालकांना ट्राफिकमुक्त रस्त्यांवरुन त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे.

या बोगद्याचा फायदा पूर्व दिल्लीसोबतच गाझियाबाद आणि नोएडातील नागरिकांना मिळणार आहे.
या बोगद्याचा फायदा पूर्व दिल्लीसोबतच गाझियाबाद आणि नोएडातील नागरिकांना मिळणार आहे.

गाझियाबाद आणि नोएडातील लोकांनाही मिळणार लाभ

रिंग रोडवरील प्रगती पावर स्टेशनपासून सुरू होणारा 1.6 किमी लांबीचा बोगदा नॅशनल स्पोर्ट्स क्लबजवळ पोहोचेल. पूर्व दिल्लीसोबतच गाझियाबाद आणि नोएडा येथील लोकांनाही याचा लाभ मिळणार आहे. भैरव मार्ग आणि मथुरा रोडच्या ट्राफिकमध्ये न अडकता ते आपल्या निश्चितस्थानी पोहोचू शकतील. त्याचबरोबर मथुरा रोडची वाहतूकही सुकर होणार आहे. डीपीएस मथुरा रोड ते भगवान दास टी पॉइंट दरम्यानचे चार सिग्नल हटवण्यात आल्याने आयटीओ चौकातही काही मिनिटांत पोहोचणे आता शक्य होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...