आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Incident In Madhya Pradesh, A Nursing Student Said That A Single Syringe Was Given For Corona Vaccine

एकाच सिरिंजने 40 मुलांचे लसीकरण:मध्य प्रदेशातील घटना, कोरोना लसीसाठी एकच सिरिंज दिल्याचे नर्सिंगच्या विद्यार्थ्याने सांगितले

सागर (मध्य प्रदेश)6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील सागर या जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरणात आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी एका नर्सिंगच्या विद्यार्थ्याला जैन पब्लिक स्कूलमध्ये बालकांना लसीकरण करण्यासाठी पाठवले. त्यांनी चाळीस मुलांना एकाच सिरिंजने लस दिली. पालकांनी गोंधळ घातला, तेव्हा विद्यार्थ्याने सांगितले की, अधिकाऱ्यांनी एकच सिरिंज दिली होती आणि सांगितले होते की सर्व मुलांना ही लसीकरण करावे लागेल. त्यांने ही माहिती दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

निष्काळजीपणामुळे पालकांमध्ये खळबळ
जैन पब्लिक स्कूलमधील लसीकरण शिबिरासाठी आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांच्या जागी एका नर्सिंग विद्यार्थ्याची ड्युटी लावली होती. नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी जितेंद्र याने लस देण्यास सुरुवात केली. त्यांनी एकाच सुईने एकामागून एक 40 मुलांना लस दिली.

इयत्ता 9वीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला लस देण्यासाठी दिनेश नामदेव आले असता सर्व मुलांना एकाच सुईने लस दिली जात असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानी याला विरोध केला असता जितेंद्रने सांगितले की, आपल्याला एकच सिरिंज देण्यात आली आहे. यावर दिनेश यांनी आक्षेप घेतला. त्यांच्यासोबत इतर पालकही जमले आणि एकच गोंधळ उडाला.

बेजबाबदार वर्तन
बुधवारी सागर येथील 52 केंद्रांवर लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक शिबिरातील लसीकरण पथकात 2 सदस्य असतात. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे 40 केंद्रांवर लसीकरणाची जबाबदारी खासगी महाविद्यालयातील नर्सिंग विद्यार्थिनींवर सोपविण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी सांगतात. विभागीय कर्मचाऱ्यांनी केवळ 12 केंद्रांवर लसीकरण केले होते.

एकाच सिरिंजने लसीकरण केल्याची माहिती मिळताच पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातला.
एकाच सिरिंजने लसीकरण केल्याची माहिती मिळताच पालकांनी शाळेत एकच गोंधळ घातला.

एफआयआर नोंदवला
जितेंद्र अहिरवार यांच्याविरोधात आरोग्य विभागाने एफआयआर नोंदवला असून जिल्हा लसीकरण अधिकारी एसआर रोशन यांच्याविरोधात विभागीय चौकशीसाठी प्रशासनाला पत्र दिले आहे. सीएमएचओ डॉ. डीके गोस्वामी सांगतात की, बालगृहात तीन पथके पाठवून रक्ताचे नमुने घेतले जात असून, जिल्हा रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी लॅबमधून त्यांची तपासणी केली जाईल.

NHM चे संचालक (भोपाळ) डॉ. संतोष शुक्ला यांनी माहिती दिली की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय राज्यस्तरीय टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये राज्य AEFI सल्लागार डॉ. रवींद्र बाबले, राज्य RIMNE सल्लागार डॉ. रामकुमार राय आणि राज्य प्रशिक्षण समन्वयक सूर्यप्रकाश दीक्षित यांचा समावेश आहे. हे पथक गुरुवारी सागरला पोहोचत आहे.

अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.एस.आर.रोशन सांगितले की, पथकांना दिलेल्या लसींच्या संख्येनुसार सिरिंज देण्यात आल्या. विद्यार्थ्याकडून त्या हरवल्या असाव्यात. तसे असेल तर त्याने मला फोन करून सांगायला हवे होते.

बातम्या आणखी आहेत...