आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Incident Near Moga, Punjab, Fighter Jet Was On Routine Flight; Search For Pilot Continues

दुर्घटना:MIG-21 कोसळल्याने पायलटचा मृत्यू, स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांनी पंजाबहून राजस्थानला उड्डाण घेतली, मोगामध्ये एअरक्राफ्ट झाले क्रॅश

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिग-21 एयरफोर्सचा कणा मानले जात होते

पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील लंगियाना खुर्द गावात गुरुवारी रात्री एअरफोर्सचे लढाऊ विमान MIG-21 क्रॅश झाले. या अपघातात पायलट स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. वायुसेनेने घटनेची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाला दिले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका प्रशिक्षण सत्रादरम्यान पायलट अभिनव चौधरी यांनी मिग -21 ने राजस्थानमधील सूरतगड येथे प्रयाण केले, परंतु मोगामध्ये विमान कोसळले.

मार्च मध्येही MIG-21 बायसन क्रॅश झाले होते
यापूर्वी 17 मार्चलाही एका अपघातात फायटर विमान MIG-21 बाइसन उड्डाणादरम्यान क्रॅश झाले होते. या अपघातामध्ये एअरफोर्सच्या कॅप्टनने जीव गमावला होता. यापूर्वी जानेवारीमध्ये राजस्थानच्या सूरतगडमध्येही मिग-21 बायसन क्रॅश झाले होते. त्यावेळी उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक अडचण आली होती.

मिग-21 एयरफोर्सचा कणा मानले जात होते
एकेकाळी मिग-21 ला भारतीय हवाईदलाचा कणा मानले जात होते. मात्र आता हे विमान जुने झाले आहे. अपग्रेड करुनही हे आता युद्धासाठी फिट नाहीत आणि उड्डाणासाठीही फिट नाहीत. गेल्या 5 वर्षांमध्ये 483 पेक्षआ जास्त मिग विमानांचा अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये 170 पेक्षा जास्त पायलटांनी जीव गमावला आहे.

बातम्या आणखी आहेत...