आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमा वाद:सिक्कीम सीमेवर भारत-चीन सैनिकांत धक्काबुक्की, दोन्ही देशांचे सैनिक जखमी

सिक्कीमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही देशांचे सैनिक या घटनेत आक्रमक दिसून आले

भारत आणि चीनचे सैनिक सप्टेंबर २०१९ नंतर पुन्हा एकदा आमनेसामने आले. सिक्कीममध्ये नाकूलामध्ये चीनच्या सीमेवर शनिवारी दोन्ही देशांच्या सैनिकांत तणाव निर्माण झाला. या वेळी झालेल्या धक्काबुक्कीत दोन्ही बाजूंचे काही जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. नंतर दोन्ही लष्कराच्या अधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर प्रकरण मिटवण्यात आले आणि पुन्हा वातावरण निवळले.

लष्करातील सूत्रांनी रविवारी सांगितले की, या घटनेत १५० जवानांचा समावेश होता. बऱ्याच काळानंतर दोन्ही सैन्यांत असा संघर्ष झाला. भारत-चीन सीमा निश्चित नसल्याने दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अनेकदा या भागात तणाव निर्माण होत असतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लद्दाखच्या पँगोंग लेक भागात दोन्ही देशांच्या जवानांमध्ये धक्काबुक्की झाली होती. तर, ऑगस्ट २०१७ मध्ये अरुणाचल प्रदेश लगतच्या चीन सीमेवर डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैनिक ७३ दिवस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. चर्चेनंतर प्रकरण मिटवण्यात आले. या घटनेनंतर एप्रिल २०१८ मध्ये वुहानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली होती. यात सीमेसंदर्भातील वाद सोडवण्यासाठी चर्चेची प्रक्रिया सुरू करण्यावर एकमत झाले होते.

बातम्या आणखी आहेत...