आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Income Tax Action; Raids At 100 Locations Across The Country Including Delhi, Rajasthan And Maharashtra

आयकर विभागाकडून 100 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी:राजस्थानमधील मंत्र्यांच्या अड्ड्यांवर तर छत्तीसगडमध्ये दारू-स्टीलच्या व्यापाऱ्यांवर छापेमारी

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर विभागाने बुधवारी देशभरात 100 ठिकाणी धडाधड छापे टाकले आहेत. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडसह 7 राज्यांमध्ये आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. हे छापे मद्य घोटाळा, मीड डे मील, राजकीय निधी आणि करचोरीशी संबंधित आहेत.

औरंगाबादेत बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास इन्कम टॅक्स विभागाची मोठी कारवाई झाली आहे. सहकार नगर भागात ७ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. आयटी विभागाची मोठी टीम यामध्ये काम करत आहे. अद्याप नेमकी किती लाखांची रक्कम हाती लागली याबद्दल बोलण्यास कुणीही तयार नाही.

राजस्थानचे राज्यमंत्री राजेंद्र यादव आणि त्यांच्या नातेवाईकांच्या 53 हून अधिक ठिकाणांवर आयकर छापे टाकण्यात आले आहेत. बुधवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे. हे प्रकरण मीड डे मील पुरवठ्या संबंधित आहे. कोटपुतली येथे मीड डे मीलचा पुरवठा करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकण्यात आल्याचे राजेंद्र यादव यांच्याकडून सांगण्यात येत आहे. जयपूरमधील त्यांच्या सरकारी आणि खाजगी निवासस्थानाव्यतिरिक्त काही ठिकाणी आयकर विभागाच्या टीप पोहचल्या आहेत.

राजस्थानचे गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांची भागीदारी असलेल्या कारखान्यावर छापा टाकण्यासाठी आयकर विभागाचे पथक जयपूरजवळील कोटपुतली येथे पोहोचले.
राजस्थानचे गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांची भागीदारी असलेल्या कारखान्यावर छापा टाकण्यासाठी आयकर विभागाचे पथक जयपूरजवळील कोटपुतली येथे पोहोचले.

मीड डे मील प्रकरणातच प्राप्तिकर पथकांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. हे छापे कुठे टाकण्यात आले याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

छत्तीसगडमधील रायगड येथील व्यावसायिकाच्या घरीही आयकराची कारवाई सुरू आहे.
छत्तीसगडमधील रायगड येथील व्यावसायिकाच्या घरीही आयकराची कारवाई सुरू आहे.

स्टील-दारू व्यापारी निशाण्यावर
छत्तीसगडमध्ये काही मद्यविक्रेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यामध्ये अमोलक सिंग असे एका दारू व्यावसायिकाचे नाव आहे. रामदास अग्रवाल, त्यांचा मुलगा अनिल, ऐश्वर्या किंगडमच्या आरके गुप्ता यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. हे प्रकरण दारू घोटाळा आणि करचुकवेगिरीशी संबंधित आहे.

बुधवारी सकाळी नऊ वाजता आयटी टीम लखनऊच्या छितवापूर येथील गोपाल राय यांच्या घरी दाखल झाल्या आहेत.
बुधवारी सकाळी नऊ वाजता आयटी टीम लखनऊच्या छितवापूर येथील गोपाल राय यांच्या घरी दाखल झाल्या आहेत.

यूपीतील 24 शहरांमध्ये छापे

आयकर विभागाच्या यूपीच्या 24 शहरांमध्ये छापे टाकत आहे. राजधानी लखनऊमध्ये बुधवारी सकाळी आयकर विभागाची टीम राष्ट्रीय क्रांतीकारी समाजवादी पक्षाचे प्रमुख गोपाल राय यांच्या घरी पोहोचली. गोपाल राय सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ग्रीव्हन्स अँड इन्व्हेस्टिगेशन नावाची संस्था चालवतात. ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या घरी कागदपत्रांची छाननी सुरू आहे. हे प्रकरण राजकीय निधी आणि करचुकवेगिरीशी संबंधित आहे.

बंगळुरूमध्ये करचोरी प्रकरण
अहवालानुसार, आयकर विभागाच्या टीम बेंगळुरूमध्ये 20 हून अधिक ठिकाणी पोहचल्या आहेत. मणिपाल ग्रुपवरही कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व छापे आयकर चोरीशी संबंधित आहेत. यासंदर्भात माहिती मिळाली होती. या कारवाईबाबत आयकर विभागाकडून अजून काही खुलासा करण्यात आलेला नाही.

6 ठिकाणी सीबीआयचे छापे

ममता सरकारचे कायदा मंत्री मलय घटक यांच्या 6 ठिकाणांवर सीबीआयने बुधवारी सकाळी छापे टाकले. घटक यांच्यावर कोळसा तस्करीचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या 3 पथके सकाळी 8 वाजल्यापासून घटक यांच्या निवासस्थानासह 6 ठिकाणी शोध घेत आहेत. त्यापैकी कोलकात्यात 5 ठिकाणी आणि आसनसोलमधील एका ठिकाणी टीम दाखल झालेल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...