आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तियांच्या घर, कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे; कारवाईचा संबंध राजकारणाशी जोडू नये-भाजप

आयकर विभागाच्या धाडी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे आयकर विभागाच्या धाडी थांबवण्यात आल्या होत्या, त्याच पुन्हा सुरू झाल्या -संबित पात्रा

राजस्थानमध्ये सत्ता संकटाची चर्चा असतानाच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निकटवर्तियांच्या समस्या वाढल्या आहेत. गहलोत यांच्या जवळच्या उद्योजकांच्या घरांवर आयकर विभागाचे छापे सुरू झाले. आयकर विभागाचे 200 अधिकारी आणि कर्मचारी राजस्थान ते दिल्लीपर्यंतच्या ठिकाणांवर धाड टाकत आहेत. अशोक गहलोत यांचे जवळचे काँग्रेस नेते आणि ज्वेलर राजीव अरोरा यांच्या ठिकाणांवर सोमवारी सकाळी आयकर विभागाची धाड पडली. यात अरोरा यांच्या घरासह कार्यालयावर छापे टाकण्यात आले. या धाडींची माहिती स्थानिक पोलिसांना देखील देण्यात आली नाही. आयकर विभागासोबत स्थानिक नाही तर केंद्रीय राखीव पोलिस दलाचे कर्मचारी आहेत.

आणखी एक काँग्रेस नेते धर्मेंद्र राठोड यांच्या ठिकाणांवर सुद्धा धाड टाकण्यात आल्या. जयपूर, कोटा, दिल्ली आणि मुंबई येथे आयकर विभागाची कारवाई झाली. धर्मेंद्र राठोड सुद्धा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्ती आहेत. या दोन्ही नेत्यांची चौकशी केली जात असून त्यांच्या परदेशातील व्यवहाराचां सुद्धा तपास होत आहे. 
कुठलाही षडयंत्र नाही, रुटीन कारवाई असल्याचा भाजपचा दावा

राजीव अरोरा हे राजस्थान काँग्रेसचे आर्थिक व्यवस्थापन करतात. एकीकडे राजस्थानातील राजकीय परिस्थिती आणि दुसरीकडे, धाडी पाहता केंद्रातील भाजप सरकारकडून मुद्दाम लक्ष्य केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रसने देखील भाजपवर सरकार अस्थिर करण्याचे कट कारस्थान करत असल्याचे आरोप केले. परंतु, भाजपने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, की कोरोना आणि लॉकडाउनमुळे आयकर विभागाच्या धाडी थांबवण्यात आल्या होत्या. त्याच आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. याचा राजस्थानचे राजकीय संकट आणि राजकारणाशी काहीच संबंध नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser