आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Income Tax Raid On Dainik Bhaskar Group News And Updates | Bhopal, Madhya Pradesh, Delhi, Rajasthan, Gujrat, Maharashtra, Dainik Bhaskar Group; News And Live Updates

भोपाळ:दैनिक भास्कर समूहात प्राप्तिकर चौकशी तिसऱ्या दिवशीही सुरूच; कारवाईदरम्यानच विभागाने जारी केले प्रसिद्धिपत्रक

भोपाळ/नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • असहमतीनंतरही प्राप्तिकर विभागाच्या निवेदनातील प्रमुख अंश

केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाची दैनिक भास्कर समूहात चौकशी तिसऱ्या दिवशीही सुरू होती. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने एक प्रसिद्धिपत्रक जारी केले असून त्यात काही दस्तऐवजांमध्ये अनियमितता आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, विधी आणि करतज्ज्ञांच्या मते, चौकशी सुरू असताना पत्रक जारी करणे आश्चर्यकारक आहे.

विभागाच्या विविध पथकांनी गुरुवारी दैनिक भास्कर समूहाच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि नोएडातील कार्यालये व 20 इतर इमारतींवर कारवाई सुरू केली होती. केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकांना भास्कर समूहाकडून सहकार्य केले जात आहे.

निष्पक्ष पत्रकारितेचा धर्म : असहमतीनंतरही प्राप्तिकर विभागाच्या निवेदनातील प्रमुख अंश
प्राप्तिकर विभागाच्या दाव्यांशी असहमतीनंतरही भास्कर समूह त्यांच्या निवेदनाचे प्रमुख अंश प्रकाशित करत आहे. प्राप्तिकर विभागाने शनिवारी रात्री निवेदन जारी करून दावा केला की, समूहात 6 वर्षांत 700 कोटींच्या उत्पन्नावरील करांबाबत अनियमितता दिसली आहे. त्याची चौकशी केली जात आहे. तसेच विविध कंपन्यांत सायक्लिकल ट्रेड, फंड ट्रान्सफर व रिअल इस्टेट कंपनीत कर्जाबाबतही चौकशी सुरू आहे.

प्राप्तिकर विभागाने निवेदनात म्हटले आहे की, कंपनीच्या उत्पन्न-खर्चाबाबत तपासणी सुरू आहे. विविध व्यवहार आणि टॅक्स पेमेंटची कागदपत्रे तपासली जात आहेत. या सर्व मुद्द्यांवर भास्कर व्यवस्थापनाने म्हटले आहे की, विभागाने ज्या अनियमितता सांगितल्या, त्यात कोणत्याही प्रकारचा घोळ नाही. या सर्व मुद्द्यांवर त्यांना संपूर्ण तथ्यात्मक माहिती आणि दस्तऐवज उपलब्ध केले जात आहेत. जेणेकरून स्थिती स्पष्ट होऊ शकेल. दुसरीकडे, विभागाने सांगितले की, लखनऊस्थित आणखी एका समूहाची चौकशी पूर्ण झाली आहे. तेथील कागदपत्रांत उत्पन्न व करांत अनियमितता आढळल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...