आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Income Tax Raid Vs Dainik Bhaskar; BBC Washington Post News After Income Tax Raid At India's Largest Newspaper Group

भास्कर IT Raid वर वर्ल्ड मीडिया:​​​​​​​वॉशिंग्टन पोस्टने म्हटले - महत्वपूर्ण कव्हरेजच्या काही महिन्यांनंतर भारताच्या टॉप न्यूजपेपरवर आयकर विभागाचे छापे

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • BBC ने गंगेत मृतदेह तरंगणे आणि मृतांच्या योग्य आकड्यांचा उल्लेख करत वृत्त प्रकाशित केले

दैनिक भास्करवरील आयकर विभागाच्या छाप्याच्या बातम्या आता जागतिक माध्यमापर्यंतही पोहोचल्या आहेत. संसदेत सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज या प्रकरणामुळे आधीच स्थगित करण्यात आले आहे. आता ही बातमी परदेशी माध्यमातही पसरली आहे.

परदेशी माध्यमांचे म्हणणे आहे की दैनिक भास्कर हे गेल्या काही महिन्यांपासून सामान्य लोकांसाठी महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध करत होते. असे केल्याच्या काही महिन्यांतच भास्कर ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

वॉशिंग्टन पोस्टने इनकम टॅक्स विभागाला विचारले भास्करवर रेड टाकण्याचे कारण, प्रवक्ताने म्हटले - सांगू शकत नाही

अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टने हेडलाइनमध्ये लिहिले, 'आवश्यक कव्हरेजच्या काही महिन्यांच्या आतच वृत्तपत्रावर आयकर विभागाने छापा टाकला'

संपूर्ण वृत्त देत वॉशिंग्टन पोस्टने म्हटले - भारतातील सर्वात प्रमुख वृत्तपत्रावर छाप्याचे कारण म्हणजे, कोरोना काळात केलेले आवश्यक कव्हरेज हे आहे. भारतातील पत्रकार आणि राजकीय व्यक्तीच्या हवाल्याने म्हटले की, सरकारचे सत्य समोर आणल्यानंतर भास्करवर छापा टाकण्यात आला आहे.

वॉशिंग्टन पोस्टने टॅक्स अथॉरिटी प्रवक्ता सुरभि अहलुवालिया यांच्यासोबतही छाप्याविषयी चर्चा केली. परंतु छापा टाकण्याचे कारण विचारले असता त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. वॉशिंग्टन पोस्टने भारतातील आपल्या स्त्रोतांचा हवाला देताना लिहिले आहे - भास्करवरील ही कारवाई सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या कव्हरेजमुळे करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन पोस्टने प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या जबाबालाही जागा दिली आहे. प्रेस क्लबने म्हटले आहे की, अशी कारवाई आणि सरकारी एजेंसींच्या माध्यमातून सरकार माध्यमांच्या स्वातंत्र्यांवर हल्ला करते.

BBC ने गंगेत मृतदेह तरंगणे आणि मृतांच्या योग्य आकड्यांचा उल्लेख करत वृत्त प्रकाशित केले
अशा प्रकारे BBC ने म्हटले की, सीबीडीटी (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज) च्या प्रवक्ता सुरभी जायसवाल यांना छापेमारीविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, ठोस वृत्त आहे की, छापेमारी केली जात आहे, मात्र कारण विचारल्यावर त्या शांत झाल्या. त्यांनी छापेमारीचे कोणतेही कारण सांगितले नाही.

BBC ने आपल्या वृत्तामध्ये भास्करच्या त्या ट्विटचा समावेश केला आहे, ज्यामध्ये भास्करने म्हटले आहे की, भास्करमध्ये चालणार आता वाचकांची मर्जी. याच बातमीमध्ये बीबीसीने भास्करची गंगेमध्ये मृतदेह आणि मृतांच्या खऱ्या आकड्यांच्या रिपोर्टिंगचा उल्लेखही केला आहे.

बातम्या आणखी आहेत...