आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Income Tax Raids In Labor Minister's Home, Office In Telangana, Another Minister Trapped Within 15 Days

छापेमारी:तेलंगणात कामगारमंत्र्यांच्या घरी, कार्यालयात आयकर छापे, 15 दिवसांतच अडकले दुसरे मंत्री

हैदराबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर विभागाच्या सुमारे ५० टीमने मंगळवारी तेलंगणाचे कामगारमंत्री मल्ला रेड्‌डी व त्यांच्या नातेवाइकांच्या घरी व कार्यालयावर छापे टाकले. मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज व एका रुग्णालयासह अनेक शैक्षणिक संस्था मल्ला ग्रुप चालवतो. याच संस्थांमध्ये करचोरीच्या आरोपांनंतर विभागाने ही कारवाई केली आहे.

टीआरएसचे २५ मोठे नेते रडारवर... {९ नोव्हेंबर २०२२ रोजी कथित ग्रॅनाइट घोटाळ्यात ईडीने तेलंगणचे अन्न पुरवठा मंत्री गंगुला कमलाकर यांच्या ठिकाणांवरही छापे टाकले होते. {टीआरएसचे २५ आमदार रिअल इस्टेट, आरोग्य, शिक्षण व दारूसारख्या व्यवसायाशी जोडलेले आहेत. {पशुपालन मंत्री टी. श्रीनिवास यादव केंद्रावर टीका करत म्हणाले, टीआरएस घाबरणारा नाही. घाबरलो असतो तर हैदराबादेत राहिलो नसतो.

बातम्या आणखी आहेत...