आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड-१९ नंतर बाजारात प्रचंड मागणी तसेच वस्तूंच्या किमती वाढल्याने वस्तू आणि सेवा कराने (जीएसटी) संकलनाचा नवा विक्रम नोंदवला आहे. फेब्रुवारीपर्यंत म्हणजे ११ महिन्यांत एकूण जीएसटी संकलन १६.५० लाख कोटी रुपये राहिले. सरकारने या वर्षी १३.८५ लाख कोटी रुपये जीएसटी संकलनाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतरही सलग पाचव्या वर्षी देशातील जीडीपीत अप्रत्यक्ष कराचे योगदान आयकराहून कमी राहील. कारण या वर्षी सरकारने १६.५० लाख कोटी रुपये आयकर संकलनाचा अंदाज बांधला आहे. १० मार्चपर्यंत १३.७३ लाख कोटी रुपये आले आहेत. याप्रमाणे आयकराचे जीडीपीत ६.०२ टक्के योगदान राहू शकते. या तुलनेत अप्रत्यक्ष कराचे जीडीपीतील योगदान ५.०७ % पर्यंत मर्यादित राहील. जीएसटीच्या आधी म्हणजे २०१६-१७ मध्ये जीडीपीत त्याचे योगदान ५.६५% इतके होते, तर आयकराचे ५.५७%. २०२१-२२ मध्ये आयकराचे जीडीपीतील योगदान वाढून ६.१०% पर्यंत गेले. त्या तुलनेत जीएसटीतील योगदान वाढण्याऐवजी घटून ५.६०% राहिले.
आर्थिक जाणकारांनुसार पाच वर्षांत जीएसटी संकलनात अंदाजापेक्षा खूपच कमी वाढ दिसून आला. अप्रत्यक्ष करातील जाणकार अशोक बत्रा म्हणाले की, ‘सरकारने जीएसटीत वार्षिक १४% वाढीचा अंदाज वर्तवला होता. या आधारे राज्यांना १४ % नुकसान भरपाईही देण्यात आली. जीएसटीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे प्रमुख विजय केळकर यांनीही दावा केला होता की, जीएसटी आल्यानंतर जीडीपीत २.२% इतकी वाढ होईल. मात्र हे लक्ष्य गाठण्यात अपयश आल्याचे दिसत आहे.’
१२% विकास दरही कमीच, पुढच्या वर्षी हे अंतर वाढणार
या आर्थिक वर्षात अप्रत्यक्ष कर संकलन १२% वाढण्याचा अंदाज आहे. या आधारे जीएसटी संकलन १५.२९ लाख कोटी होऊ शकते, तर आयकर संकलन १८.५० लाख कोटीपर्यंत राहू शकते.म्हणजेच अंतर वाढून ३ लाख कोटींहून जास्त होईल. या वर्षी ८ कोटी लोक आयकर भरतील. हा आकडा २०१६-१७ मध्ये ५.२८ कोटी इतका होता. २०१६-१९ मध्ये ८० लाख व्यापारी अप्रत्यक्ष कर भरत होते. हे प्रमाण २०२२-२३ मध्ये ७.५७ कोटी इतके झाले आहे.
एकूण जीएसटी संकलन
२०१७-१८ ७,१९,०७८
२०१८-१९ ११,७७,३७०
२०१९-२० १२,२२,११७
२०२०-२१ ११,३६,८०३
२०२१-२२ १४,७६,०००
२०२२-२३* १६,४९,५५७
*फेब्रुवारीपर्यंत, संकलन कोटी रुपयांत
करवाढ जीडीपीशी लिंक्ड, संकलन वाढेल थेट सवाल {विवेक जोहरी, अध्यक्ष, केंद्रीय अप्रत्यक्ष कर महामंडळ (सीबीआयसी), नवी दिल्ली
{जीएसटी संकलन अंदाजापेक्षा जास्त झाले. कर वाढवण्यात महागाईचे योगदान जास्त राहिले? इतर कारणेही आहेत. कोविडनंतरचे पहिले वर्ष सामान्य होते. लोक बाहेर पडले. हॉटेल-पर्यटन वाढले. जीएसटी रिटर्न वाढले. यामुळे जीएसटी रिटर्न वाढला. {पुढील आर्थिक वर्षात करवाढीचा अंदाज १२% आहे. जास्त नाही. कारण खप घटण्याचा अंदाज आहे? अगदी शक्य आहे. नाममात्र वाढ १०.५% राहील. अंदाज जीडीपीशी लिंक्ड आहे. त्यामुळे उद्दिष्ट सहजपणे साध्य होईल. {तुम्ही सांगत आहात की, वीज बिल आणि मालमत्ता कराच्या रेकॉर्डमुळे कर संकलन वाढण्यामध्ये मदत मिळेल? शक्यता शोधत आहोत. जे कर भरत नाहीत त्यांची ओळख पटवणार. {ऑडिट किती सहायक ठरेल? ऑडिटमुळे गेल्या वर्षी २२,००० कोटींची करचोरी पकडली होती. आता जिल्हा-तालुकास्तरावर ऑडिट करत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.