आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Increase In Petrol diesel Rates For The Third Day In A Row After The Election; News And Live Updates

पेट्रोल-डिझेल दरवाढ:निवडणूक संपताच सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ ; परभणीत पेट्रोल 99 रुपये 68 पैसे प्रतिलिटर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल 25 पैसे प्रतिलिटर आणि डिझेल 30 पैसे प्रतिलिटर महाग झाले.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक संपताच देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल २५ पैसे प्रतिलिटर आणि डिझेल ३० पैसे प्रतिलिटर महाग झाले. विशेष म्हणजे भारतीय बास्केटच्या कच्च्या तेलाचा सरासरी दर एप्रिल महिन्यात ६४.४० डॉलर प्रतिबॅरल होता, तो मार्चपेक्षा (६४.७३ डॉलर प्रतिबॅरल) कमी आहे. निवडणूक आयोगाने २६ फेब्रुवारीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती.

त्यानंतर २७ फेब्रुवारीला पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली होती. नंतर ३ मेपर्यंत दरवाढ झाली नाही. २४ मार्च, ३० मार्च आणि १५ एप्रिलला दरात किरकोळ कपात झाली होती. २ मे रोजी निवडणूक निकाल आल्यानंतर फक्त एक दिवस दिलासा मिळाला. ४ मेपासून पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. गेल्या तीन दिवसांत झालेल्या बदलांत पेट्रोलचे दर ५९ पैसे आणि डिझेलचे दर ६९ पैसे प्रतिलिटर असे वाढले आहेत.

परभणीत पेट्रोल ९९ रुपये ६८ पैसे प्रतिलिटर
परभणीत ६ मे राेजी पेट्रोल ९९ रुपये ६८ पैसे, डिझेल ८९ रुपये ३९ पैसे तर पॉवर पेट्रोल १०३ रुपये ९ पैसे प्रतिलिटर होते. परभणीत १ ते ३ मे दरम्यान पेट्रोलचे दर ९८ रुपये ९४ पैसे, डिझेलचे दर ८८ रुपये ५२ पैसे तर पॉवर पेट्रोलचे दर १०२ रुपये ३६ पैसे होते. ४ मेपासून यात वाढ होण्यास सुरुवात झाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...