आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात साेन्याचा भाव आणि वाढत्या मागणीसाेबतच तस्करीच्या घटनांतही वाढ झाली आहे. अलीकडेच मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी एका दिवसात ६१ किलाे साेने जप्त केले हाेते. ते सुमारे ३२ काेटी रुपये किंमतीचे आहे. विभागाने एक दिवसात केलेली ही सर्वात माेठी जप्तीची कारवाई मानली जाते. दुबई व भारतात साेन्याच्या किंमतीमधील अंतर प्रती १० ग्राम ७ हजार रुपये आहे. सीमा शुल्क अधिकाऱ्यांना चुकवण्यात एखादा तस्कर यशस्वी झाल्यास ताे अर्धा किलाे साेन्यावर ३ लाख रुपये कमाई करू शकताे. महसुली गुप्तचर संचालनालयाच्या म्हणण्यानुसार २०२१-२२ मध्ये ४०५ काेटी रुपयांचे ८३३ किलाे साेने जप्त केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.