आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CORONA IS OUT OF CONTROL , Corona Patients Increased Again After One Day, 3,205 New Patients In 24 Hours; Death Of 31 Patients

कोरोना संसर्गात पुन्हा वाढ:एका दिवसानंतर पुन्हा वाढले कोरोनाचे रुग्ण, 24 तासांत 3,205 नव्या रुग्णांची नोंद; 31 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,205 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये काहीशी घट झाली होती, सोमवारी देशात 2,568 नवीन रुग्ण आढळले होते, मात्र मंगळवारी पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारांच्या पुढे गेली आहे.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 19,509 आहे. महामारीच्या सुरुवातीपासून देशात एकूण 5.23 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.

कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या देशात 18,317 संक्रमित लोकांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी देशात कोरोनाचे 13,137 सक्रिय रुग्ण आढळले. त्याच वेळी, देशातील पॉझीटिव्हिटीचा दर 1.22% वर गेला आहे.

दिल्ली हे कोरोनाचे हॉटस्पॉट

दिल्ली हे कोरोनाचे हॉटस्पॉट राहिले आहे, गेल्या अनेक दिवसांपासून येथे हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे 1,414 नवीन रुग्ण आढळले. यापूर्वी राजधानीत 1,076 प्रकरणे आढळून आली होती. एक दिवसा पूर्वी दिल्लीत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. येथे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5,986 झाली आहे.

इतर राज्यांतील कोरोनाच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रात 182 रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशमध्ये 193, हरियाणामध्ये 505 आणि केरळमध्ये 386 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, 24 तासांत 54 मृत्यूंपैकी 52 केवळ केरळमध्येच झाले आहेत.

कोवोव्हॅक्स लस मिळणार आता फक्त 225 रुपयांत

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने मंगळवारी कोवोव्हॅक्स लसीच्या किमतीत कपात केली. SII ने प्रत्येक डोसची किंमत 900 रुपयांवरून 225 रुपयांपर्यंत कमी केली आहे. त्यात कराचा समावेश नाही. 12-17 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोविड-19 लसीकरणासाठी सोमवारीच कोविन पोर्टलवर कोव्होवॅक्स( Kovovax )जोडण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...