आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Increased Conflict Between The Government And The Opposition On New Agricultural Bill, Congress Set Fire To Tractors At India Gate; This Is A Conspiracy Of Riots: BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन कृषी कायदा:सरकार व विरोधकांतील संघर्षात वाढ, काँग्रेसने इंडिया गेटवर पेटवून दिले ट्रॅक्टर; हे दंगलीचे षड‌्यंत्र : भाजप

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषी विधेयकाच्या विरोधात देशभरात शेतकऱ्यांचा आक्रोश, यूपीत उत्तर प्रदेशात काँग्रेसची निदर्शने, प्रदेशाध्यक्ष लल्लू अटकेत

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरात आक्रोश वाढला आहे. पंजाब युवा काँग्रेसच्या सुमारे १५ कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी राजधानी दिल्लीत एका ट्रकने ट्रॅक्टर उतरवले आणि त्याला पेटवून दिले. याबरोबरच ‘इन्कलाब जिंदाबाद’ च्या घोषणा देण्यात आल्या. झोपलेल्या सरकारला उठवा, अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजची छाननी करून तपास केला जात अाहे. ट्रॅक्टर पेटवून देणाऱ्याची ओळख पटवली जाईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. या घटनेबद्दल भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख नीलकांत बक्षी म्हणाले, युवा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाईल. हिंसाचार पसरवण्यासाठी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथे जाणूनबुजून ट्रॅक्टर आणून त्याला आग लावली. ते देशात दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही हा कट पूर्ण होऊ देणार नाही. दुसरीकडे आम्हाला तसेच कार्यकर्त्यांना राजघाटावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करू दिले नाही. पोलिसांनी विराेध केला होता, असा आरोप काँग्रेस नेते उदित राज यांनी केला होता.

विरोधी : संसद व बाहेर आवाज दडपण्याचे प्रयत्न

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर नवीन कृषी कायद्याबाबत एक बातमी पोस्ट केली. ‘कृषीसंबंधी कायदा शेतकऱ्यांसाठी मृृत्यूचे फर्मान आहे. त्यांचा आवाज संसद तसेच बाहेर अशा दोन्ही ठिकाणी दडपला जात आहे,’ असे राहुल यांनी म्हटले. कृषी विधेयकावरील मतदानावेळी विरोधी पक्षातील सदस्य आसनावर उपस्थित नव्हते, असे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी म्हटले होते. परंतु राज्यसभा टीव्ही फुटेजवरून हा दावा साफ खोटा असल्याचे सिद्ध झाल्याचे बातमीत आहे.

सरकार : काँग्रेसचे निंदनीय नाटक, चेहरा उघड : भाजप

इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवून देण्याच्या प्रकरणात भाजपने काँग्रेसवर टीका केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, आज काँग्रेसने देशाची मान खाली घातली. आधी ट्रॅक्टरला ट्रकमध्ये टाकून इंडिया गेटवर आणण्यात आले. नंतर त्याला पेटवले गेले. काँग्रेसच्या या नाटकाचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राजकारण करतेय. काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पडला. त्यांनी प्रचारासाठी हे नाटक केले. हे निदर्शक पंजाब युवा काँग्रेसचे असल्याचे सांगितले जाते. त्यांना ताब्यात घेतले आहे.

देशाची स्थिती : पंजाबच्या सीएमचे धरणे

पंजाब : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग नागर जिल्ह्याच्या खटकर कला गावात धरणे आंदोलनात सहभागी झाले. अमरिंदर म्हणाले, पंजाबसाठी शेतकरीच जीवनदायिनी आहेत. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू.

उत्तर प्रदेश : लखनऊमध्ये पोलिसांनी निदर्शने करणारे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली. हा काळा कायदा असल्याचा आरोप लल्लूंनी केला.

हरियाणा : उत्तर प्रदेशातील काही शेतकरी धान्य विक्रीसाठी हरियाणातील कर्नाला मंडईला जात होते. परंतु त्यांना सीमेवर रोखण्यात आले. सुमारे ५० शेतकरी शेतीमालाचे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह तेथेच ठिय्या धरून होते.

कर्नाटक : कर्नाटकमध्ये साेमवारपासून राज्यभरात शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू झाले. पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कलबुर्गी जिल्ह्यात कडक बंदोबस्त वाढवला.

बातम्या आणखी आहेत...