आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Increased Expenditure On Food, Electricity, Housing Is More In UK, US And Germany Than In India

​​​​​​​एसबीआयचा अहवाल:अन्न, वीज, घरावर वाढलेला खर्च ब्रिटन, अमेरिका अन् जर्मनीत भारताहून अधिक

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खर्च अन्नधान्याचा असो, विजेचा अथवा राहण्याचा... या अत्यावश्यक गोष्टींवर भारतीयांना अमेरिका, ब्रिटन व जर्मनीतील लोकांच्या तुलनेत कमी खर्च करावा लागत आहे. स्टेट बँकेच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. सप्टंेबर २०२१ ते सप्टेंबर २०२२दरम्यान भारतात ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) १२.२ रुपये, अमेरिकेत तो २२.५ डॉलर, ब्रिटनमध्ये ११.४ पौंड तर जर्मनीत ११ युरो इतका वाढला. महागाईमुळे जगभरातील बँकांना व्याजदर वाढवणे अपरिहार्य ठरले. यामुळे जगण्यासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत भारत इतर देशांच्या तुलनेत कुठे आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे चित्र स्पष्ट झाले. यात खर्चाची तुलना रुपयांत करण्यात आली. ग्राहक मूल्य निर्देशांकातील अन्न, वीज व घर हा विचार करता भारत सरस ठरला. अहवालानुसार, जगण्यासाठी आवश्यक व्यवस्थापनात इतर देशांच्या तुलनेत भारत चांगलाच यशस्वी ठरला आहे.

अनिश्चिततेच्या काळातही भारत हा वाळवंटातील हिरवळीसारखा चिवट आयएमएफने इशारा दिला होता की, जगभरात उदरनिर्वाहाचा खर्च वाढला आहे. चांगली बाब म्हणजे, या काळातही भारत हा वाळवंटातील हिरवळीसारखा चिवट म्हणून कायम आहे.’ - सौम्य कांती घोष, मुख्य अार्थिक सल्लागार, एसबीआय

दरडोई उत्पन्नात वेगाने उसळी : आश्चर्याची बाब म्हणजे, गेल्या ८ वर्षांत भारतात दरडोई उत्पन्न वाढले आहे. डॉलर्सच्या हिशेबात त्यात ५७ टक्क्यांची उसळी आली.

वीजपुरवठा सप्टेंबर २०२१ मध्ये सर्व देशांत १०० रुपये खर्च करावे लागत होते. सप्टेंबर २०२२ मध्ये अमेरिकेत त्यात १२ रुपये ब्रिटन ९३, जर्मनीत ६२ रुपये वाढले. भारतात मात्र केवळ १६ रुपयेच वाढले आहेत.

घर सप्टेंबर २०२१ मध्ये जर १०० रुपये खर्च करावे लागत असतील तर सप्टेंबर २०२२ मध्ये अमेरिकेत २१ रु., ब्रिटन ३०, जर्मनीत २१ रुपये वाढले. भारतात खर्च फक्त ६ रुपयांनी वाढला.

भोजन सप्टेंबर २०२१ मध्ये सर्व देशांत १०० रुपये खर्च करावे लागत होते. सप्टेंबर २०२२ मध्ये अमेरिकेत २५ रु., ब्रिटन १८, तर जर्मनीत ३३ रुपयांनी खर्च वाढला. भारतात मात्र तो केवळ १५ रुपयांनीच वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...