आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ind Vs Nz Hockey World Cup | India Coach Graham Reid On Team | Ind Vs Nz | Hockey World Cup

महत्त्वाच्या सामन्यांसाठी आमचे खेळाडू मानसिकदृष्ट्या तयार नाही ?:पुरुष हॉकी कोच ग्रॅहम रीड म्हणाले - संघाला मानसोपचार तज्ज्ञाची गरज

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांनी रविवारी रात्री न्यूझीलंडविरुद्ध हरल्यानंतर आणि विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला पुढे जाण्यासाठी मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षकाची गरज असल्याचे सांगितले. त्याच्या या वक्तव्यामुळे भारतीय पुरुष हॉकी संघाचे खेळाडू महत्त्वाच्या सामन्यांचे दडपण हाताळू शकत नाहीत दिसून येते.

रविवारी झालेल्या क्रॉसओव्हर टायमध्ये न्यूझीलंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा 5-4 असा पराभव केला. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघ 3-3 असे बरोबरीत होते. भारताने सामन्यात वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला पण पेनल्टी शूटआऊटमध्ये दबावाला बळी पडले.

मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे

मॅचनंतरच्या कॉन्फरन्समध्ये रीड पुढे म्हणाले की, जोपर्यंत प्रशिक्षण आणि प्रक्टिसचा संबंध आहे, आम्ही इतर संघ जे करतो ते करतो. मी या खेळात बराच काळ आहे आणि इतर संघ काय करत आहेत हे मला माहीत आहे. मला वाटते की आमच्या संघाने मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे.

पेनल्टी शूटआऊटमध्ये 9 शॉट्सपर्यंत गेला सामना

दोन्ही संघांनी 9-9 असे प्रयत्न केले. यामध्ये न्यूझीलंडने 5 तर भारताने 4 गोल केले. शूटआऊटची सुरुवात भारतीय कर्णधार हरमनप्रीतने केलेल्या गोलने झाली. त्यानंतर न्यूझीलंडच्या निक वुडने बरोबरी साधली. त्यानंतर राजकुमार पालने गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर शॉन फिंडलेने 2-2 अशी बरोबरी साधली. तिसर्‍या प्रयत्नात अभिषेकचा गोल हुकला आणि हेडन फिलिप्सने गोल करून पाहुण्यांना 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर पीआर श्रीजेशने 3 शानदार सेव्ह करत भारताला पराभवापासून वाचवले. दरम्यान, समशेर गोल करण्यापासून चुकला आणि सुखजीतने गोल केला. 5 प्रयत्नांनंतर स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. अशा प्रकारे शूटआउट सुरूच होता.

वुड निक आणि हरमनप्रीत सिंग यांचा सहाव्या प्रयत्नात गोल हुकले. तर शॉन फिंडले आणि राजकुमार पाल यांनी गोल केले. हेडन आणि सुखजीत यांना 8 व्या प्रयत्नात गोल करता आला नाही. सॅम लिनने 9व्या प्रयत्नात गोल केला. तर समशेर करण्यात चुकला.

कर्णधाराला संधी होती पण तो चुकला

न्यूझीलंडच्या निक वूड्सने ही संधी गमावल्याने कर्णधार हरमनप्रीत सिंगला सहाव्या प्रयत्नात सडन डेथच्या पहिल्या फेरीत सामना जिंकण्याची संधी होती, मात्र हरमनने दूरवरून थेट हिट करण्याचा निर्णय घेतला आणि ही सुवर्ण संधी हुकवली. यावर हरमनप्रीत सिंग म्हणाला, ही चांगली संधी होती आणि मला गोल करायचे होते. पण असे झाले नाही. हा सांघिक खेळ आहे. प्रत्येकजण पेनल्टी कॉर्नरमधील माझ्या खराब कामगिरीबद्दल बोलत होता. पण, मी सामन्यांमध्येही गोल केल्या आहेतच. मला कोणतेही दडपण जाणवत नाही. मला आणि टीमला भविष्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे

बातम्या आणखी आहेत...