आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Independence Day 2021 News And Updates | Ground Report From Meerut And Ballia On 75th Independence Day

मेरठ आणि बलियातून ग्राउंड रिपोर्ट:क्रांती नेता ‘पांचली’ला तोफांनी उडवले होते, अद्यापही जखमांचे अश्रू भळभळतात, ऑगस्ट क्रांतीचे पुजारी चित्तू बाबांचे किस्से मुलांना ऐकवतात गावातील ज्येष्ठ

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा पट लिहिताना अशी अनेक त्यागाची प्रतीकं आहेत, जी काळाच्या धुळीत दबलेल्या इतिहासात धूसर दिसताहेत. मात्र, यांचा उल्लेख प्रत्येक भारतीयाच्या नसा चेतवण्यासाठी पुरेसा आहे.

मीरत : जिथे ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रथम क्रांती झाली
क्रांती नेता ‘पांचली’ला ताेफांनी उडवले होते, अद्यापही जखमांचे अश्रू भळभळतात
जरा याद करो कुर्बानीः
४ जुलै १८५७ च्या सकाळी इंग्रजांनी पांचली गावावर तोफांचा भडिमार केला. २ विहिरी व एक तलाव मृतदेहांनी भरला. गगोल गावच्या ९ जणांना दसऱ्याला फाशी दिली. तेव्हापासून तिथे दसरा साजरा होत नाही.

ब्रिटिश सत्तेविरुद्ध १८५७ मध्ये स्वातंत्र्याचा पहिला लढा लढणाऱ्या मीरतमध्ये शेकडो गौरवगाथांचे दफन झाले आहे. पांचली खुर्द असेच एक गाव. येथूनच १८५७ च्या क्रांतीने देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा पाया रचला. विविध किश्शे, कथांचा वारसा लाभलेल्या येथील ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्याचा विषय निघताच हळवे होतात, त्यांना अश्रू अनावर होतात. येथील महेंद्रसिंह(७१) यांची भेट झाली. ते क्रांतिकारक कोतवाल धनसिंह यांच्या ७ व्या पिढीचे वंशज आहेत.

महेंद्रसिंह म्हणाले, इतिहासात काही नाही. जे आमच्याकडे होते, ते लोकांनी संशोधनाच्या नावाखाली परत केले नाही. यानंतर सिंह गौरवगाथांचे किस्से एेकवू लागले. ते म्हणाले, १८५७ चा एप्रिलचा महिना होता. दोन इंग्रज सैनिक आणि एक मॅडम गावच्या बागेत आले. तिथे उपस्थित तीन शेतकरी मंगत, नरपत आणि झज्जडशी त्यांची शाब्दिक चकमक उडाली. वाद वाढला आणि संघर्ष झाला. एक इंग्रज आणि मॅडमला पकडले, दुसरा इंग्रज पळून गेला. दोषींना अटक करण्याची जबाबदारी कॅप्टन धनसिंह यांच्या वडिलांकडे सोपवली. ते गावचे प्रमुख होते. गावप्रमुखाने तीन बंडखोरांना सोपवले नाही तर गावकऱ्यांना शिक्षा मिळेल. यावर नरपत आणि झज्जडनी आत्मसमर्पण केले, मंगत फरार झाले. दोघांना ३०-३० फटके आणि जमीन काढून घेण्याची शिक्षा मिळाली. मंगतच्या कुटुंबातील तीन सदस्यांना फाशी दिली. या घटनेमुळे धनसिंहसह पांचलीच्या एक-एक मुलास बंडखोर केले आणि एक दिवस आधीच १० मे रोजी मीरतमध्ये सैनिकाच्या बंडेखोरीची योजना आखली. कोतवाल धनसिंह यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरा २ वाजता तुरुंग फोडून बंडाच्या आरोपाखाली कैद ८३६ कैदी सैनिकांची सुटका करण्यात आली. यानंतर पांचली व अन्य गावांतील शेतकऱ्यांनी इंग्रजांना नेस्तनाबूत केले. मीरत राजपत्रानुसार, ४ जुलै १८५७ च्या पहाटे ४.०० वाजता पांचलीवर एक इंग्रज रिसालेने(सैन्य तुकडीचे नाव) तोफांनी हल्ला चढवला. रिसालेमध्ये ५६ घोडेस्वार, ३८ पायदळ सैनिक आणि १० तोफखान्यातील सैनिक होते. संपूर्ण गावाला तोफांनी उडवले. सिंह म्हणाले, शेकडो शेतकरी मारले गेले. जे शिल्लक राहिले त्यापैकी ४६ लोकांना कैद केले आणि यापैकी ४० जणांना नंतर फाशीची शिक्षा दिली. गावातील दोन विहिरी व तलाव मृतदेहांनी भरले हाेते. गगोल गावच्या ९ जणांना दसऱ्याला फाशी दिली. तेव्हापासून तिथे दसरा होत नाही.

बलिया: जिथे उर्वरित देशाच्या ५ वर्षे आधी आले पूर्ण स्वराज्य
ऑगस्ट क्रांतीचे पुजारी चित्तू बाबांचे किस्से मुलांना ऐकवतात गावातील ज्येष्ठ

यूपीच्या बलियाला स्वातंत्र्योत्सव काळातील स्वत:चा इतिहास आहे. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून(आताचे आझाद मैदान) गांधीजींनी “करो या मरो’ चा नारा दिल्यानंतर शेरे बलिया चित्तू पांडेय यांच्या नेतृत्वाखाली या बंडखोर भूमीच्या ५० हजार सुपुत्रांसमोर ब्रिटिश शासकांना गुडघे टेकवावे लागले होते. १९ ऑगस्ट १९४२ रोजी बलियाने देशाचे पहिले स्वातंत्र्य साजरे केले.

सध्या चित्तू पांडेय यांचे गाव रट्टचकाची दुर्दशा झाली आहे. रट्टचकमध्ये त्यांच्या नावाचा ना कोणता साइन बोर्ड आहे, ना कोणते स्मारक. गावातील ओमप्रकाश म्हणाले, ज्येष्ठ आजही मुलांना चित्तू बाबांच्या ऑगस्ट क्रांतीचे किस्से एेकवतात. ते सांगतात की, गांधीजींच्या आवाहनानंतर चित्तू पांडेय यंाच्या नेतृत्वाखाली बलिया जिल्हा कारागृहाबाहेर ५० हजार लोक हातात नांगर, मुसळ, कुदळ, फावडे, गुलेर घेऊन पोहोचले. इंग्रजांसोबतच्या चकमकीत २० पेक्षा जास्त शहीद झाले. सायंकाळपर्यंत ब्रिटिश सरकारने गुडघे टेकले. जिल्हाधिकाऱ्यासह सर्व सरकारी कार्यालयांवर तिरंगा फडकवला आणि चित्तूंनी बलियाला स्वतंत्र घोषित करत ब्रिटिश सरकारच्या समांतर बलिया प्रजासत्ताक सरकारची स्थापना केली. ते गावचे प्रमुख झाले. आठवड्यानंतर क्रूर इंग्रज अधिकारी नेदरसोलच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी बलियाचे स्वातंत्र्य हिसकावले. मात्र, या बंडाच्या ठिणगीने संपूर्ण देशात स्वातंत्र्य युद्धाला नवी ऊर्जा दिली. या छोट्या घटनेने महत्त्व यावरून कळू शकेल की, बीबीसीने आपल्या बुलेटिनमध्ये बलियावर पुन्हा ब्रिटिश सत्तेने कब्जा केल्याचे सांगितले होते. शहीर चित्तू पांडेय यांचे पणतू हरीश पांडेय म्हणाले, मला चित्तू बाबांचा अभिमान आहे. येथील गावागावात स्वातंत्र्याच्या अज्ञात स्वाभिमानी गाथा ज्येष्ठांच्या तोंडी जिवंत आहेत.

असाच एक किस्सा चित्तू पांडेय यांचे नातू रामजी यांची पत्नी सुशीला सांगतात की, इंग्रज सरकार शेरे बलियाला अटक करण्यासाठी आले होते, माहिती मिळताच बाबांनी ठिकाण बदलले. अटक न झाल्याने चवताळलेल्या इंग्रजांनी घराची जप्ती केली व सर्व सामान ते घेऊन गेले. स्वातंत्र्यसैनिक कल्याण परिषद बलियाचे मंत्री शिवकुमार म्हणाले, क्रांतिकारकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ९ ते २५ ऑगस्ट दरम्यान ऑगस्ट क्रांती उत्सव साजरा केला जातो.

इंग्रजांत आजही भीती, ब्रिटन आपल्या नागरिकांना येथे न जाण्याची अॅडव्हायझरी जारी करते

१८५७ च्या क्रांतीत जे इंग्रज मारले गेले हेाते, त्यांच्या कबरी मीरतच्या कँटमध्ये आहेत. इंग्लंडचे संशोधक आणि त्यांचे नातेवाईक येथे येत राहतात. ब्रिटिश हायकमिशन आजही त्यांना कँटच्या २० किमी क्षेत्रात क्रांतिकारकांच्या गावांत न जाण्याची अॅडव्हायझरी जारी करते. अनेक वर्षांपूर्वी एका ब्रिटिश संशाेधकाने लपतछपत पांचली गावात येऊन धनसिंहांच्या वंशजांची भेट घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...