आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Independence Day Celebration 2020 In India In (Pictures) Photos Update | Swatantrata Diwas Images News On Red Fort (Lal Qila) Delhi

फोटोंमध्ये पाहा लाल किल्ल्यावर कोरोनाचा प्रभाव:मोदींनी दूरूनच हात उंचावत मुलांना केले अभिवादन, मास्क घालून आणि 2 फूट अंतरावर बसले 4000 लोक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमात कोरोनाचा प्रभाव दिसला. मास्क घालून पाहुणे आले. अतिथींना दोन फूट अंतरावर बसवले होते. खुद्द पंतप्रधान मोदी दूरवरुन मुलांना आणि पाहुण्यांना अभिवादन करताना दिसले.

कार्यक्रमात 4000 पाहुणे दाखल झाले. शालेय मुलांऐवजी, कोरोनावर मात करणारे 1500 लोक सामील झाले. यावेळी राजकारणी, अधिकारी, डिप्लोमॅट्स आणि मीडिया कर्मचाऱ्यांसह 4 हजाराहून अधिक लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. गेल्या वर्षीपर्यंत पंतप्रधानांचे भाषण पाहण्यासाठी किमान 10,000 लोक या सोहळ्याला उपस्थित होते. लाल किल्ल्यावरुन असे फोटो आले समोर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्याच्या कार्यक्रमात केशरी आणि क्रीम कलरचा गमछा चेहऱ्यावर लावून जाताना दिसले. त्यांनी गमछा केवळ भाषण देत असताना काढला.

हा फोटो व्हीव्हीआयपी स्टँडचा आहे. येथे देखील सर्वच पाहुण्यांना अंतरावर बसवण्यात आले.

यावेळी लाल किल्ल्यावर समारोहात शालेय विद्यार्थ्यांऐवजी 1500 कोरोनावर मात करणारे लोक सहभागी झाले.

लोकसभा स्पीकर ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर आणि हर्षवर्धन देखील उपस्थित होते. सर्वांना पूर्ण वेळ मास्क घातलेले होते.

केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमणही मास्क घातलेल्या दिसल्या.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी आणि किरन रिजिजु देखील सोशल डिस्टेंसिंगसह बसले.

लाल किल्ल्याच्या कार्यक्रमात सामिल एअरफोर्सचे जवानही मास्क घालून होते.

भाषणानंतर मोदी लोकांना भेटायचे, मात्र यावेळी असे झाले नाही. ते थेट आपल्या गाडीजवळ गेले.

बातम्या आणखी आहेत...