आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Independence Day Celebration | Flag Hoisting At Red Fort | Narendra Modi | Olympic Team | Independence Day Latest News And Updates Today

75 वा स्वातंत्र्य दिवस आज:केशरी पगडी घालून राजघाट येथे पोहोचले पंतप्रधान, महात्मा गांधींच्या समाधीवर अर्पण केले फूल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रमात उपस्थित राहतील.

ब्रिटिश राज्यापासून स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यावर देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केशरी पगडी घालून राजघाट येथे पोहोचले आणि महात्मा गांधींच्या समाधीवर फूल अर्पण केले. त्यांनी गांधींच्या समाधीची परिक्रमा देखील केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी ट्विट करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षात देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना संचारली पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केले.
लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना ऑलिम्पिक खेळाडू.
लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना ऑलिम्पिक खेळाडू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रमात उपस्थित राहतील. ते तिरंगा फडकवून राष्ट्राला संबोधित करतील. या प्रसंगी ऑलिम्पिक पदक विजेते लाल किल्ल्यावर उपस्थित राहतील. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रथमच हवाई दलाचे हेलिकॉप्टर फुलांचा वर्षाव करतील. पंतप्रधानांनी अहमदाबादच्या साबरमती येथून मार्च 2021 मध्ये आझादीच्या अमृत महोत्सवाची सुरुवात केली होती. या अंतर्गत कार्यक्रमांची मालिका 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ला
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ला

अपडेट्स

  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील आपल्या घरी झेंडा वंदन केले.
  • ऑलिम्पिकमध्ये गोल्ड जिंकणाऱ्या नीरज चोप्राने म्हटले की, आम्ही नेहमी टीव्हीवर झेंडा वंदन पाहत आलो आहोत. पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर येण्याची संधी मिळत आहे. हा नवीन अनुभव आहे.
  • केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावला.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, भारताने 15 ऑगस्ट 1947 ला प्रदीर्घ लढाईनंतर स्वातंत्र्य मिळवले. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला. अमेरिकेत राहणाऱ्या 40 लाख भारतीय-अमेरिकन लोकांचेही त्यांनी अभिनंदन केले.
बातम्या आणखी आहेत...