आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India 88,641 Corona Patients, 711 Deaths In A Single Day; The 'peak' Of The Second Wave Is Possible By Mid April

सावधान:एकाच दिवसात 88,641 रुग्ण, 711 मृत्यू, 36.71 लाख डोस; दुसऱ्या लाटेचा ‘पीक’ एप्रिलच्या मध्यापर्यंत शक्य

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात लसीकरणास 77 दिवस पूर्ण, 7 कोटी डोस

देशात यंदा प्रथमच शुक्रवारी तब्बल ८८,६४१ नवे कोरोना रुग्ण आढळले. मृत्यूनेही ७११ चा उच्चांक गाठला. दुसरीकडे, गुरुवारी पहिल्या दिवशी देशात कोरोना लसीचे एकूण ३६.७१ लाख डोस देण्यात आले. पैकी २०.४५ लाख डोस ४५-५९ वयोगटातील लोकांना देण्यात आले. याआधी देशात रोज दिल्या जाणाऱ्या लसींची सरासरी १८ ते २० लाख होती. ती आता दुप्पट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, एक एप्रिलला एकूण ३६,७१,२४२ डोस देण्यात आले. यासोबतच शुक्रवारी देशात लसीकरणाला ७७ दिवस पूर्ण झाले. आजवर ७ कोटी डोस देण्यात आले आहेत. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी शुक्रवारी संध्याकाळच्या बैठकीत ११ सर्वात कोरोनाग्रस्त राज्यांना टप्पेनिहाय पद्धतीने पात्र लोकांचे १००% लसीकरण करण्याचे निर्देश दिले.

दिल्लीत कोरोनाची चौथी लाट, लॉकडाऊन नाही : केजरीवाल
शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘देशासाठी कोरोनाची दुसरी लाट असू शकते, पण दिल्लीत ही चौथी लाट आहे. कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. हा चिंतेचा विषय आहे, पण घाबरण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण निगराणी करत आहे. सध्या लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारांना लसीकरणाबाबत निर्णय घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी आहे.’

सावधान! दुसऱ्या लाटेचा ‘पीक’ एप्रिलच्या मध्यापर्यंत शक्य
आयआयटी कानपूरच्या वैज्ञानिकांनी गणितीय मॉडेलचा अभ्यास करून देशात कोरोनाची दुसरी लाट एप्रिलच्या मध्यापर्यंत ‘पीक’वर राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मेअखेरपर्यंत संसर्गात मोठी घसरण दिसू शकते. पहिल्या लाटेदरम्यान ‘सूत्र’नावाच्या मॉडेलने अंदाज व्यक्त करण्यात आला होता की, ऑगस्टच्या सुरुवातीला संसर्ग वाढेल आणि सप्टेंबरपर्यंत उच्चांक गाठेल. फेब्रुवारीत कमी होईल. हे खरे ठरले होते. वैज्ञानिक मनिंद्र अग्रवाल यांच्या मते,पंजाब हे पहिले राज्य असेल, जेथे काही दिवसांत रुग्णसंख्या उच्चांकावर जाईल. त्यानंतर महाराष्ट्रात ‘पीक’ येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...