आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिप्टोसाठी धोरण तयार करणार:क्रिप्टो उद्ध्वस्त झाल्याने भारत सतर्क, बजेटमध्ये घोषणा शक्य

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिप्टो एक्स्चेंज ‘एफटीएक्स’चे रातोरात दिवाळे वाजले. ३२ अब्ज डॉलरची त्याची संपत्ती एकाएकी शून्य झाली. क्रिप्टोच्या व्यवहारात अनेक वेळा फसलेल्या भारतीयांसाठी हा फार मोठा झटका ठरला. एफटीएक्समध्ये भारतीय गुंतवणूकदारांचाही पैसा बुडला असल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. क्रिप्टो व्यवहारांबाबत ठोस निर्णय घेण्याचा सरकारचा विचार असून त्याच्याशी संबधित सर्वांचा विचारविनिमय केला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले. फेब्रुवारीतील आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार याप्रकरणी आपले धोरण स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

क्रिप्टोबद्दलच्या धोरणात नरमाई नव्हे तर आणखी कठोर होणार भारतीय रिझर्व्ह बँकने क्रिप्टोबद्दल वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आहे. डिजिटल संपत्तीवर कर लावला. म्हणजे कोणत्याही संपत्तीला कर कक्षेतून वगळण्यात आले नाही. त्यामुळेच देशहित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कल पाहून क्रिप्टो धोरण आखण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. भारताला जी-20 चे अध्यक्षपद मिळाले असल्याने या गटाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. त्यासाठी ३ मार्ग आहेत.

1 जगभरात क्रिप्टोवर बंदी लादण्यासाठी कार्यक्रम तयार करणे. अर्थसंकल्प व जी-20 मध्ये ठामपणे भूमिका मांडणे.

2 क्रिप्टोबाबत जगभरात आदर्श ठरेल,अशी नियमावली भारताला तयार करावी लागेल.

3 क्रिप्टो अवैधच ठरवावे. त्यातील उत्पन्नावर कर लादून व्यवहार करणेही कठीण होईल,असा उपाय करणे.

बायनान्स भारतात काम करणार नाही; म्हणाले, क्रिप्टो पोषक वातावरण नाही जगातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्स्चेंज बायनन्सचे सीईओ चांगपेंग झाओच्या मते, भारतात क्रिप्टोसाठी पोषक वातावरण नाही. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर एक टक्का कर लावला अन् युजर एका दिवसात ५० ट्रेड करीत असेल तर त्यापैकी ७० टक्के पैसा गमावेल.

एक वर्षात अनेक करन्सी नामशेष , क्रिप्टोचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर एक वर्षापूर्वी क्रिप्टो उद्योग २४३ लाख कोटींचा होता.तेव्हापासून अनेक क्रिप्टो करन्सी नामशेष झाल्या आहेत. क्रिप्टोचे नियमन केले तरीही गुंतवणूकदारांना पैशांची हमी देणे शक्य नाही. एफटीएक्स घोटाळा झाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास उडाला असून क्रिप्टोचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

बातम्या आणखी आहेत...