आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India And United States Relations | Vande Bharat Mission Air India Flights News Updates; US Restricted Flights From India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वंदे भारत मिशन:अमेरिकेने एअर इंडियाच्या स्पेशल विमानांवर घातली बंदी, भारतावर लावला एव्हिएशन अॅग्रीमेंट तोडण्याचा आरोप

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना विमानाद्वारे आपल्या देशात आणले जात आहे

अमेरिकेने भारताच्या स्पेशल फ्लाइट्सला अमेरिकेत येण्यास बंदी घातली आहे. 22 जूनला जारी केलेला हा आदेश 30 दिवसांच्या आत लागू केला जाईल. ब्लूमबर्ग मीडियाच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने भारतावर एव्हिएशन अॅग्रीमेंट तोडण्याचा आरोप लावला आहे.

कोरोनादरम्यान, भारताने इंटरनॅशनल फ्लाइट्स सुरू केल्या होत्या. परंतू, वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स लावल्या होत्या.

आमच्या एअरलाइंसला नुकसान होत आहे- अमेरिका

अमेरिकेच्या ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट विभागाचे म्हणने आहे की, भारत सरकारने दुसऱ्या देशातून आपल्या देशात येण्यासाठी एअर इंडियाचे विमान लावले आहेत आणि एअर इंडिया तिकीट विक्रीतून पैसेही कमवत आहे. दुसरीकडे, अमेरिकन एअरलाइंसवर भारतात येण्यास बंदी घातली आहे. यामुळे अमेरिकन एअरलाइंसला नुकसान होत आहे. एअर इंडिया कोरोनाच्या पुर्वीपेक्षा 50% ज्यास्त फ्लाइट्सच्या शेड्यूलची जाहिरात करत आहे. असे दिसत आहे की, एअरलाइन्स आपल्या देशातील नागरिकांच्या वापसीच्या नावाने धोका करत आहे.

भारताने बंदी हटवल्यास आम्ही बंदी हटवण्याचा विचार करू

अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ ट्रांसपोर्टचे म्हणने आहे की, भारतीय एअरलाइंसने अमेरिकेतील ऑपरेशन्सपूर्वी आम्हाला सांगावे, म्हणजे आम्ही त्यांच्यावर नजर ठेवू शकू. भारताने अमेरिकन एअरलाइंसवरील बंदी हटवल्यानंतरच आम्ही एअर इंडियावरील बंदी हटवणार.

बातम्या आणखी आहेत...