आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Army Canteen Vocal For Local Updates; 1000 Imported Products Delisted From Kendriya Police Kalyan Bhandars (KPKB)

कसा बनेल आत्मनिर्भर भारत ?:पॅरामिल्ट्री फोर्समधून परदेशी उत्पादनावरील बंदीच्या निर्णयावरुन सरकारची माघार, आता म्हणाले- लवकरच नवीन लिस्ट जारी होईल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीएम मोदींच्या अपीलवर गृह मंत्रालयाने जारी केला होता आदेश

पॅरामिल्ट्री फोर्सने सोमवारी एक हजार परदेशी उत्पादनांना कँटीनमध्ये विकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आता काही तासानंतर गृह मंत्रालयाने आदेश जारी करत परदेशी सामानांची लिस्ट होल्डवर ठेवण्यास सांगितले आहे. तसेच, नवीन लिस्ट लवकर जारी होईल, असेही सांगितले आहे. गृह मंत्रालयाने 13 मे रोजी घोषणा केली होती की, देशभरातील 1700 सेंट्रल पोलिस किंवा सीएपीएफ कँटीनमध्ये फक्त स्वदेशी वस्तुंची विक्री होईल.

पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचा मंत्र दिला होता

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतच देशाच्या नावे केलेल्या संबोधनात आत्मनिर्भर भारताचा मंत्र दिला होता. यावेळी त्यांना देशातील नागरिकांना परदेशी सोडून स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याची अपील केली होती. यानंतर गृह मंत्रालयने आपल्या आखत्यारीत येणाऱअया विभाग आणि सशस्त्र दलात स्वदेशी उत्पादनांना चालना देण्याचे ठरवले. लष्करदेखील याच निर्णयावर ठाम आहे. लष्करप्रमुखांनी परदेशी उत्पादनांना लष्करातून बाहेर काढत असल्याचे म्हटले होते. 

पॅरामिल्ट्रीने या उत्पादनांवर बंदी घातली

फुटवियर, स्केचर, रेड बुल ड्रिंक, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, कपड़े, टूथ पेस्ट, हैवेल्सचे प्रोडक्ट्स, हॉरलिक्स, शँपो, बॅगसह अनेक परदेशी उत्पादनांवर बंदी घातली. आता यांची जागा फक्त स्वदेशी उत्पादनेच घेतली. जवानांनाही अपील केली आहे की, त्यांनी परदेशी वस्तुंचा त्याग करावा.

10 लाख जवान, 50 लाख कुटुंबीय करतात वापर

पॅरामिल्ट्री फोर्समध्ये सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी, असम रायफल्सचे अंदाजे 10 लाखांपेक्षा जास्त जवान आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळून 50 लाखांपेक्षा जास्त लोक सेंट्रल पोलिस कँटीनमधून खरेदी करतात. आता हे सर्व लोक स्वदेशी उत्पादनांची खरेदी करतील. गृह मंत्रालयाने यासाठी तीन कॅटेगरी बनवली आहे. सर्वात जास्त प्राथमिकता त्या प्रोडक्टसला दिली जाईल, जे पूर्णपणे भारतात तयार होतात आणि भारतीय कंपन्या तयार करतात. दुसऱ्या कॅटेगरीत त्या वस्तुंना सामील केले आहे, ज्यांचा कच्चा माल आयात होतो, पण वस्तू भारतात बनतात. या दोन्ही कॅटेगरीमधील उत्पादनांना परवानगी दिली आहे. तिसऱ्या कॅटेगरीती संपूर्णपणे परदेशी उत्पादने आहेत, सध्या यावरच बंदी घातली आहे.

0