आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वाेच्च पातळीवर १६ दिवस चाललेल्या कूटनीतीचे सकारात्मक फलित म्हणून बुधवारी भारताने अफगाणिस्तानच्या जटिल मुद्द्यावर अमेरिका आणि रशियाला एकत्र येण्यास भाग पाडले. काबूलमध्ये तालिबानवर लगाम लावणे, दहशतवादाविरुद्ध त्यांच्या कटिबद्धतेची हमी घेणे व कायद्याचे राज्य बहाल करण्याचे आव्हान साकारण्यासाठी भारतीय प्रयत्नांतर्गत अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स व रशियन सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाय पत्रूशेव्ह यांना एकाच वेळी नवी दिल्लीत बोलावण्यात आले.
हा आंतरराष्ट्रीय कूटनीतीत भारताचा मास्टरस्ट्रोक असल्याचे म्हटले जाते. सीआयएप्रमुखांचा भारत दौरा गोपनीय ठेवण्यात आला आहे. त्यांच्या दौऱ्याला दुजाेरा वा खंडन करण्यास सरकारी सूत्र तयार नाहीत. मात्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या पटेल भवन मुख्यालय ते जवाहर भवनात परराष्ट्र मंत्रालय आणि साऊथ ब्लॉकमध्ये पंतप्रधान कार्यालयातील हालचाली व सेक्युरिटी सायरनच्या आवाजांमुळे त्यांची उपस्थिती लपू शकली नाही.
२४ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरील चर्चेचा ‘फाॅलोअप’ म्हणून पत्रूशेव्ह यांचा भारत दौरा झाल्याचे रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. पत्रूशेव्ह बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व एनएसए अजित डोभाल यांना भेटले. दुसरीकडे, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व अमेरिकी परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांच्यातील चर्चेमुळे सीआयएच्या हाय प्रोफाइल टीमच्या भारत दौऱ्याचा रोडमॅप तयार झाला.
अमेरिकी अजेंडा : भारताने ग्राउंड इंटेलिजन्समध्ये मदत करावी, रशियाशी चर्चेचा सेतू कायम राहावा
चर्चेशी संबंधित सूत्रांनी भास्करला सांगितले की, अमेरिकी लष्कराच्या माघारीमुळे ओढवलेल्या नामुष्कीचे डाग अमेरिकेला धुऊन काढायचे आहेत. मात्र, अफगाणिस्तानाबाहेर पडल्यानंतरही तालिबानच्या अनेक गटांवर अमेरिकेची पकड आहे. रशियालाही त्याचाच फायदा घ्यायचा आहे. अमेरिकेला भारताकडून पुढील अपेक्षा आहेत...
रशियाचा अजेंडा : तालिबानला दहशतवादाच्या मार्गापासून वेगळे ठेवावे, अफगाणिस्तानमधून होणारे पलायन थांबावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील एकमत पुढे नेत रशियन सुरक्षा परिषदेचे प्रमुख व एनएसए अजित डोभाल यांच्यात या मुद्द्यांवर भर देण्यात आला.
ही उद्दिष्टे कशी पूर्ण होणार?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.