आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • India Can Get Russia's Corona Vaccine; Gamaleya Shared With India The Data Of The Trials, The Third Phase Of Tests Could Take Place In The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीन:भारताला मिळू शकते रशियाची कोरोना लस; गामालेयाने शेअर केला ट्रायल्सचा डेटा, देशात होऊ शकतात तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सर्वाधिक रुग्णांच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या नंबरवर
 • अशीच स्थिती राहिल्यास 12-15 दिवसांत अमेरिकेलाही मागे टाकेल

भारतातील कोरोना रुग्णांच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकले आहे. आता अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत. अशीच स्थिती राहिली तर भारत लवकरच जगातील सर्वाधिक संक्रमित देश बनेल. अशावेळी सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नही वेगाने वाढवले आहे.

फेज-3 चाचणीच्या निकालापूर्वीच रशिया आणि चीनने त्यांच्या लस वापरण्यास परवानगी दिली आहे. हे लक्षात घेता भारत सरकार रशियन लसीवर लक्ष ठेवून आहे. रशियाला लसीशी संबंधित डेटा मागितला होता. ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस प्रमाणेच, गामालेयाच्या लसीची देखील भारतात चाचणी असू शकते. यामुळे लवकरात लवकर लस मिळण्याची शक्यता वाढेल.

भारताने रशियाकडून डेटा मागितला होता

 • मॉस्कोच्या गामालेया रिसर्च इन्स्टीट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीच्या SPUTNIK V लसीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात होते. कारण त्याचा डेटा उपलब्ध नव्हता. मेडिकल जर्नल लँसेटने याच्या चाचण्यांचे परिणाम प्रकाशित केले आहे.
 • लँसेटमध्ये प्रकाशित स्टडीनुसार SPUTNIK V परिणामकारक आणि सुरक्षित आहे. रशियन रिसर्च इन्स्टिट्यूटने लॅन्सेटमध्ये प्रकाशित केल्यानंतर लस चाचण्यांचा डेटा भारतीय अधिकाऱ्यांना शेअर केला आहे. लॅन्सेटमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, 76 लोकांवर लसीची चाचणी घेण्यात आली आणि यामुळे त्यांच्यात रोगप्रतिकारक प्रतिक्रीया वाढली आहे.
 • रशियामधील भारतीय राजदूत डीबी वेंकटेशन वर्मा तसेच बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी या संपूर्ण डेटा ट्रान्सफरचे संयोजन केले आहे. गामालेयाकडून मिळालेल्या विस्तृत डेटाचे भारतातील डॉक्टर मूल्यांकन करीत आहेत. नियामकांकडून आवश्यक परवानग्या घेऊन भारतात फेज-3 चाचणी देखील होऊ शकतात.
 • SPUTNIK V च्या अधिकृत वेबसाइटनुसार रशियाची सौदी अरेबिया, यूएई, ब्राझील आणि फिलीपाइन्समध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची तयारी आहे. तसेच भारतासह 20 देशांनी लसीमध्ये रस दर्शवला असल्याचे लिहिले आहे.

या आठवड्यापासून, रशियामध्ये जनतेला लस देणे सुरू होईल

 • रशियन मेडिकल वॉच डॉग या आठवड्यात लसीची गुणवत्ता तपासेल आणि 13 सप्टेंबरपूर्वी मंजुरी दिली जाऊ शकते. यानंतर, सरकार नागरिकांच्या वापरासाठी ही लस अधिकृत करेल.
 • रशियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सहयोगी सदस्य डेनिस लोगुनोव्ह म्हणाले की, बरेच देश अद्याप लस तपासणीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत परंतु या आठवड्यात रशिया नागरी वापरासाठी आपली लस SPUTNIK V मंजूर करेल. या आठवड्यात पहिली बॅच रिलीज होईल.

लसीचा प्रारंभिक डेटा 15 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होईल

 • जगभरात 175 पेक्षा जास्त देश कोरोनाची लस बनवत आहेत. यामध्येही जवळपास 35 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात आहेत. यांचे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.
 • आठ लसी फेज-3 चाचणीत आहेत. यामध्ये ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेकाचे कोवीशील्ड आघाडीवर आहे. याच्या चाचण्या भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू झाल्या आहेत.
 • ब्रिटनच्या औषध निर्माता कंपनीने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) बरोबर एक अब्ज डोस तयार करण्याचा करार केला आहे.
 • एसआयआयने गेल्या आठवड्यात फेज -2 आणि फेज -3 चाचण्या सुरू केल्या. यामध्ये 1,600 स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने अमेरिकेतही चाचण्या सुरू केल्या आहेत. तेथे 30 हजार स्वयंसेवकांना सहभागी करण्यात आले आहेत. लवकरच रशिया आणि जपानमध्ये देखील चाचण्या सुरू होतील.