आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:गुरुवारी 70 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद तर 1,020 पेक्षा जास्त मृत्यू; देशातील एकूण रुग्णसंख्या 33.77 लाखांवर

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील एकूण मृतांचा आकडा 61,650 वर

देशात गुरुवारी 70 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे तर 1,020 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान, 54 हजार 550 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 7,38,323 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 25,78,450 पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील रिकव्हरी रेट 76.24% झाला आहे. यापूर्वी बुधवारी देशभरात रेकॉर्डब्रेक 75 हजार 995 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. ही आकडेवारी covid19india नुसार आहे.

तिकडे, महाराष्ट्रातही गुरुवारी 14 हजार 857 रुग्णांची नोंद झाली, तर 355 रुग्णांचा मृत्यू झाला. यादरम्यान, 9136 रुग्ण ठीकही झाले आहेत. यासोबतच राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 7,33,568 झाला आहे, यातील 1,78,234 रुग्णांवर उपचार सुरू असून, 5,31,563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, केंद्रायी सामाजिक न्याय राज्य मंत्री कृष्णपाल गुर्जर यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. गुर्जर फरीदाबादवरुन लोकसभेवर निवडणू गेले होते. तसेच, जम्मूतील पुंछचे भाजप खासदार जुगल किशोर शर्मा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना चाचणी करुन घेण्यास सांगितले आहे.

नीट-जेईई परीक्षा घेण्यास सातराज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध

कोरोना महामारीदरम्यान जेईई आणि नीट परीक्षा घेण्यावरून आता राजकीय वाद पेटला आहे. सरकार व विरोधी पक्षांत यावरून जुंपली असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत बुधवारी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी परीक्षा टाळण्याची मागणी केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी राज्यांनी कोर्टात जावे, असा सल्ला दिला, तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अगोदर राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांची भेट घ्यावी, असा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “अमेरिकेत शाळा सुरू झाल्याने 97 हजार मुले कोरोनाबाधित झाल्याचे आढळले आहे. येथे असे घडले तर काय करायचे?’

देश-विदेशतील 150 शिक्षकांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र

नीट-जेईई परीक्षांविषयी देश-विदेशातील यूनिव्हर्सिटीजच्या 150 शिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले की, 'जर या परीक्षांना जास्त उशीर झाला तर हा विद्यार्थ्यांच्या करिअरसोबत खेळ होईल. काही लोक आपल्या राजकीय अजेंड्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत'

अॅडमिशन आणि क्लासेसवरील शंका लवकरात लवकर दूर करणे गरजेचे

या पत्रामध्ये म्हटले की, 'तरुण आणि विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत, मात्र कोरोना महामारीमुळे त्यांचे करिअर धोक्यात आले आहे. अॅडमिशन आणि क्लासेसविषयी अनेक शंका आहेत, ज्या लवकरात लवकर दूर करणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावेळीही लाखो विद्यार्थ्यी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र ते यावर्षी घरात बसून काय करायचे आहे याविषयी विचार करत आहेत.'