आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Celebrities Leaders Coronavirus Cases; Lata Mangeshkar, Rajnath Singh, JP Nadda To Nitish Kumar, Ashok Gehlot

दिग्गज व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात:​​​​​​​कोरोनाला हलक्यात घेऊ नका; लता मंगेशकर, संरक्षण मंत्र्यांसह 3 मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 1.93 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका. देशातील बडे सेलिब्रिटीही कोरोनाच्या संसर्गाला बळी पडत आहेत. मंगळवारी प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना सौम्य लक्षणे आहेत, परंतु वय ​​लक्षात घेऊन मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोना झाला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 मोठ्या व्यक्तींबद्दल सांगत आहोत, ज्यांना सध्या कोविडची लागण झाली आहे.

92 वर्षांच्या भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली. ते सध्या क्वारंटाइन आहेत.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोमवारी याविषयी माहिती दिली.

बिहा सिएमओमध्येही कोरोनाची एंट्री झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना दुसऱ्या लाटेमध्येही कोरोना झाला होता.

मोदी कॅबिनेटचे अनेक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

केंद्राच्य आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी ट्विट करत माहिती दिली की, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी घरीच स्वतःला कॉरंटाइन केले आहे.

टीएमसी नेता बाबुल सिप्रियो तिसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी ट्विट करुन यांची माहिती दिली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि काही स्टाफही पॉझिटिव्ह आढळला आहे.

बातम्या आणखी आहेत...