आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि चीनमध्ये 10 व्या फेरीतील मिलिट्री लेव्हलची चर्चा शनिवारी रात्री दोन वाजेपर्यंत म्हणजेच 16 तास चालली. ही बैठक चीनच्या मॉल्डो परिसरात झाली. यामध्ये पूर्व लडाखच्या हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि देप्सांगवरुन सैन्य मागे हटवण्यावर चर्चा झाली. मिळालेल्या वृत्तानुसार, चर्चेमध्ये भारताने आपले मत मांडत म्हटले की, या तीन क्षेत्रांमध्येही माघारीची प्रक्रिया जलद व्हावी, सीमेवर तणाव कमी करण्यात यावा.
11 फेब्रुवारीला संसदेत राजनाथ सिंह यांनी लडाखमध्ये माघारीची माहिती दिली होती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 11 फेब्रुवारीच्या सकाळी राज्यसभा आणि संध्याकाळी लोकसभेत लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य मागे हटल्याची माहिती दिली होती. या करारामुळे भारताने काहीच गमावले नाही असा दावाही त्यांनी केला होता आणि ते म्हणाले की आम्ही कोणत्याही देशाला त्याची एक इंच जमीनही घेण्यास परवानगी देणार नाही.
डिसएंगेजमेंट कराराबद्दल 7 मोठ्या गोष्टी
भारत आणि चीनने लष्करी डिसएंगेजमेंट करण्यास सहमती दर्शवली आहे. मिलिट्री डिसएंगेजमेंट म्हणजेच आतापर्यंत आमने-सामने राहिलेल्या दोन देशांच्या सैन्यांचे कोणत्याही क्षणी मागे हटणे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानुसार, डिसएंगेजमेंटसाठी 7 निर्णय झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.