आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातवांगमध्ये भारत-चीनच्या सैनिकांत हिंसक चकमक झाल्यानंतर भारतीय हवाईदलाने (IAF)अरुणाचलच्या सीमेवर कॉम्बॅट एअर पेट्रोलिंग अर्थात युद्ध उड्डाणांना सुरुवात केली आहे. 9 डिसेंबर रोजी तवांगमध्ये झालेल्या चकमकीपूर्वीही चीनने अरुणाचलच्या हद्दीत आपले ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर IAFने तत्काळ या भागात आपली लढाऊ विमाने तैनात केली होती.
एएनआयने सूत्रांचा दाखला देत आपल्या वृत्तात म्हटले आहे की, तवांगलगतच्या यांगत्सेमध्ये LAC निकटच्या होलीदीप व गस्ती भागातील भारतीय पोस्टला चीनचा विरोध आहे. मागील काही आठवड्यांत 2-3 वेळा या चौक्यांच्या दिशेने येणाऱ्या चिनी ड्रोनला भारतीय लढाऊ विमानांनी पिटाळून लावले. सुखोई-30MKI ने हे हवाई उल्लंघन रोखले होते.
LACवर AIFची चिनी ड्रोनवर नजर, रडारवर दिसताच कारवाई
सूत्रांच्या माहितीनुसार, चिनी ड्रोनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उड्डाण केल्यास भारतीय लष्कर त्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. पण विमान किंवा ड्रोनने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला व भारतीय रडारवर त्यांच्या कारवाया दिसल्या तर भारतीय हवाई दल त्याविरोधात तत्काळ कारवाई करेल.
ईशान्येत हवाई दलाची उपस्थितीत खूप मजबूत आहे. आसामच्या तेजपूर व चाबुआत अनेक ठिकाणी सुखोई-30 विमाने तैनात आहेत. राफेल फायटर जेट्सही बंगालच्या हशीमारात तैनात आहेत. ते अत्यंत कमी वेळात नॉर्थ ईस्टला कव्हर करू शकतात.
चीनचा 17000 फूट उंचीवरील तवांगवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न, ही आहेत 4 कारणे
1. चीनने 17 हजार फूटांवर चौकी स्थापन केली तर संपूर्ण अरुणाचलवर नजर
अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेलगतचे तवांग क्षेत्र जवळपास 17 हजार फुट उंचीवर आहे. ही जागा सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. तवांगहून संपूर्ण अरुणाचल प्रदेशावर नजर ठेवता येते. यामुळेच चीन हा भाग हडपण्याचा प्रयत्न करत आहे. 1962 च्या युद्धात चीनने तवांगवर कब्जा केला होता. पण शस्त्रसंधीनंतर या भागातून त्याने माघार गेतली होती. कारण, तवांग मॅकमोहन लाइन किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत येते.
2. LAC ओलांडण्याचा महत्त्वाचा पॉइंट आहे तवांग
तवांगवर चीनची वाईट नजर असण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे भारत-चीनमधील एलएसी क्रॉस करण्याच्या 2 सर्वात महत्त्वाच्या पॉइंट्सपैकी तवांग एक आहे. पहिला पॉइंट चंबा घाडी असून, ती नेपाळ व तिबेट सीमेवर आहे. दुसरी जागा तवांग आहे. ती चीन-भूटानच्या जंक्शनवर आहे. येथून संपूर्ण तिबेटवर नजर ठेवणे चीनसाठी सोपे होईल.
3. चिनी विरोधाचे सर्वात मोठे कारण धर्मगुरु दलाई लामा
तवांगप्रकरणी चीनच्या विरोधाचे तिसरे सर्वात मोठे कारण तिबेटी धर्मगुरु दलाई लामा आहेत. दलाई लामा यांनी 1959 मध्ये तिबेटमधून बाहेर पडल्यानंतर तवांगमध्ये काही दिवस घालवले होते. येथे एक मोठा बौद्ध विहार आहे. त्यामुळे चीनने तवांग ताब्यात घेणे प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे.
4. भारतीय हद्दीत चीनचा हाय वे
गुगल अर्थ मॅपनुसार, तवांगमध्य भारत-चीन सीमेवर एक हायवे बांधण्यात आला आहे. हा हायवे मॅकमोहन लाइन ओलांडून भारतीय सीमेपर्यंत पोहोचला आहे. मॅपमध्ये हा खूप लांब व दुपदरी हाय वे तिबेटला जोडताना दिसून येत आहे.
कॉम्बॅट एअर पेट्रोलिंग म्हणजे काय
9 डिसेंबर रोजी तवांगमध्ये हिंसक चकमक, लष्कराने 600 चिनी सैनिकांना पिटाळले, व्हिडिओ व्हायरल
गत 9 डिसेंबर रोजी 600 चिनी सैनिकांनी तवांगच्या यांगस्ते स्थित 17 हजार फूट उंचीवरील भारतीय पोस्टवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते ही पोस्ट काढून टाकण्याच्या प्रयत्नांत होते. त्यांच्याकडे काटेरी काठ्या व इलेक्ट्रिक बॅटनही होत्या. पण यावेळी भारतीय लष्कर पूर्णतः सज्ज होते. त्यांनीही आपल्याकडील काटेही लाठ्याकाठ्यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यात अनेक डझन चिनी सैनिक जायबंदी झाले. अनेकांची हाडे तुटली. या घटनेचा एक व्हिडोओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
वर्ल्ड मीडियाने म्हटले- तवांगमध्ये भारतापेक्षा चीनचे जास्त नुकसान : सोशल मीडियावर चकमकीचे व्हिडिओ व्हायरल, युझर म्हणाले- Tawang says hi..
9 डिसेंबरला अरुणाचलच्या तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा जागतिक मीडियामध्येही उल्लेख केला जात आहे. हाँगकाँगच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टने म्हटले आहे की, चकमक झाल्यानंतर दोन्ही सैन्य आपापल्या भागात परतले. बीबीसीने लिहिले - चकमकीत भारतापेक्षा चिनी सैनिकांचे जास्त नुकसान झाल्याची बातमी आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.