आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Army Ladakh Galwan Valley Updates | Indian Amry News | 5 Chinese People Liberation Army (PLA) Soldiers Dead, 11 Injured In Scuffle With Indian Army

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गालवनची गोष्ट:1962 च्या युद्धात गालवन घाटीत गोरखा सैनिकांच्या पोस्टला चीनी सेनेने 4 महीने घेरेले होते, यादरम्यान 33 भारतीयांचा मृत्यू झाला होता

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गालवन घाटीत गोरखा सैनिकांनी चीनी सप्लाय नेटवर्क बंद केला होता

चीनने ज्या गालवन घाटीत भारताच्या तीन जवानांना मारले. ती गालवन घाटी लद्दाखच्या एलएसीजवळ आहे. शेजारुनच गालवन नदी वाहते. हा तोच अक्साई चीन परिसर आहे, ज्याला चीनने आपल्या ताब्यात घेतले आहे. गालवन नदी काराकोरम रेंजच्या पूर्वेकडील समांगलिंगमधून निघते. नंतर पश्चिमेकडे वाहत श्योक नदीत मिळते.

गालवन घाटीचा संपूर्ण परिसर रणनीतीच्या दृष्टीने भारतासाठी महत्वाचा आहे. चीनचे अतिक्रमण रोखण्यासाठी भारतीय सैनिक गालवन नदीतून बोटीने नियमित लक्ष ठेवतात. 1962 च्या युद्धात गालवन त्या प्रमुख ठिकाणांपैकी होता, जिथे भारतीय-चीनी सेनेत युद्ध झाले होते. 

गोरखा पोस्टवर चीनने हल्ला केला होता

1962 मध्ये चीनच्या भारताच्या जमिनींवर ताबा मिळवल्याच्या दाव्यानंतर दोन्हे देशांच्या सेना एकमेकांसमोर आल्या होत्या. भारतीय गोरखा सैनिकांनी 4 जुलै 1962 मध्ये घाटीत येण्यासाठी एक पोस्ट बनवली होती. या पोस्टने समांगलिंगच्या एका चीनी पोस्टच्या कम्युनिकेशन नेटवर्कला कापले होते. याला चीनने आपल्यावरील हल्ला म्हटले होते आणि यानंतर चीन सैनिकांनी गोरखा पोस्टला 100 गजवरुन घेरले होते. भारताने चीनला धमकी दिली होती की, कोणत्याही परिस्थितीत या परिसराला रिकामे केले जाईल. यानंतर भारताने चार महीन्यापर्यंत या पोस्टवर हेलिकॉप्टरमधून अन्न आणि सैन्य सप्लाय सुरू ठेवला होता.

गालवन पोस्टवर बॉम्ब टाकण्यासाठी चीनने बटालियन पाठवल्या होत्या

भारत-चीन युद्ध 20 ऑक्टोबर 1962 ला सुरू झाले होते. चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीने या गालवन पोस्टवर मोठ्या प्रमाणात बॉम्ब टाकण्यासाठी एका बटालियनला पाठवले होते. यादरम्यान, येथील 33 भारतीय मारले गेले होते आणि अनेक कंपनी कमांडर आणि इतर लोकांना चीनी सेनेने बंदी बनवले होते. यानंतर चीनने अक्साई-चीनवर आपला दावा सांगितलेल्या सर्व परिसरावर कब्जा केला होता.

गालवनच्या पश्चिम परिसरात चीन 1956 पासून आपला दावा करत आला आहे

गालवन घाटी अक्साई चीन क्षेत्रात आहे. याच्या पश्चिम परिसरावर 1956 पासून चीन आपला दावा करत आला आहे. 1960 मध्ये अचानक गालवन नदीचा पश्चिम परिसर, आसपासचे पर्वत आणि श्योक नदी घाटीवरही चीन आपला दावा करू लागला. परंतू, भारताने अनेकवेळा सांगितले आहे की, अक्साई चीन भारताचा भाग आहे. यानंतरच 1962 मध्ये भारत-चीन युद्ध झाले.

गुलाम रसूल गालवनच्या नावावर घाटीला पडले नाव

या नदीचे नाव गुलाम रसूल गालवनच्या नावावर ठेवण्यात आले आहे. रसूल गालवन लेहचे रहिवासी होते. असे मानले जाते की, 189 मध्ये त्यांनीच या नदीचा शोध लावला होता. त्यांच्याच नावावर या घाटीचे नाव ठेवण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...