आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Border Dispute : Zomato Employees Burn Company T Shirts Protest Chinese Investment In Firm

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गलवान झडपेनंतर चीनचा विरोध:चिनी गुंतवणूक असलेल्या झोमॅटोच्या काही कर्मचाऱ्यांनी सोडली नोकरी, कंपनीचा टी-शर्ट देखील जाळला

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • झोमॅटोद्वारे फूड डिलिव्हरी ऑर्डर न करण्याचे आंदोलनकर्त्यांचे नागरिकांना आवाहन
  • झोमॅटोमध्ये चिनी कंपनी अलिबाबने सुमारे 1588 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या कर्मचार्‍यांनी लडाखमधील गलवानमध्ये भारतीय सैनिकांच्या शहादतबद्दल निदर्शने केली. कोलकाताच्या बेहाला भागात हे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी कर्मचार्‍यांनी कंपनीचा टी-शर्ट जाळला. दरम्यान आम्ही नोकरी सोडल्याचा काही कर्मचाऱ्यांना दावा केला. हे लोक चीनची कंपनी अलिबाबाच्या झोमाटोमधील गुंतवणूकीला विरोध करीत होते.

आंदोलनकर्त्यांनी लोकांना झोमॅटोद्वारे फूड डिलीवरीची मागणी न करण्याचे आवाहन केले. 2018 मध्ये, अँट फायनान्शियलने (अलिबाबाचा एक भाग) झोमॅटोमध्ये 210 मिलियन डॉलरची (सुमारे 1588 कोटी रुपये) गुंतवणूक केली आणि 14.7% हिस्सेदारी मिळवली. 

झोमॅटोने अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते

मे महिन्यात झोमॅटोने कोरोनावायरसचे कारण सांगत 520 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते. दरम्यान या आंदोलनाबाबत झोमॅटोकडून कोणतेही विधान समोर आले नाही. ज्या लोकांना हाकलून लावले गेले होते, ते लोक या निदर्शनात सहभागी होते, हेदेखील कळू शकले नाही.

चिनी कंपन्या नफा कमवत आहेत

एका निषेधकर्त्याने म्हटले आहे की एकीकडे चिनी कंपन्या भारताकडून नफा कमवत आहेत तर दुसरीकडे आमच्या सैनिकांवर हल्ले होत आहेत. ते आमची जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सहन केले जाणार नाही. दुसर्‍या निषेधकर्त्याने सांगितले की आम्ही भुकेने मरण्यासाठी तयार आहोत, परंतु चिनी कंपनीने गुंतवणूक केलेल्या कंपनीत आम्ही काम करणार नाही.

बातम्या आणखी आहेत...