आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India China Border Issue India's Proposal For Peace; China's Allegations Continue

भारत-चीन सीमा वाद:भारताकडून शांती स्थापनेचा प्रस्ताव; अडेलतट्टू चीनचे अजून आरोप सुरूच, चर्चेची तेरावी फेरीही निष्फळ

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-चीन यांच्यात पूर्व लडाख सीमा वादावर तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही बाजूंनी चर्चेच्या १३ व्या फेरीतदेखील कोणतीही सहमती होऊ शकली नाही. उलट उभय पक्षांनी आपापल्या भूमिका आणखी ठामपणे मांडल्या आहेत. मोल्दो-चुशूलमध्ये झालेल्या चर्चेत भारताच्या प्रतिनिधींनी रचनात्मक प्रस्ताव मांडला, असे भारतीय सैन्याने जाहीर केले. परंतु त्यांना चिनी पक्षाने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्याचबरोबर काही तोडगा देखील सुचवला नाही. भारताने उत्तराखंडच्या बरहोती व अरूणाचलच्या तवांगमधील चीनच्या घुसखोरीचा मुद्दाही या बैठकीतून मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु आम्ही तणाव कमी करणे आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केला आहे. परंतु भारताने ठेवलेला प्रस्ताव अव्यवहार्य आणि अवास्तव आहे. तो स्वीकारला जाऊ शकत नाही, असे चीनने म्हटले आहे. अशा प्रकारे चर्चाही होऊ शकत नाही.

भारताचे मुद्दे काय?
एलएसीवरील परिस्थितीला चीन जबाबदार आहे, असे भारतीय लष्कराने बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळेच परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. ही चीनची जबाबदारी आहे. देपसांग व पेट्रोलिंग पॉइंट-१५ मध्ये सैन्य माघारी जाण्याच्या प्रक्रियावर चीनने चर्चा करावी, असे भारतीय सैन्याला वाटते, असे सूत्रांनी सांगितले.