आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जय्यत तयारी:चीन सीमेवर हवाईदल सुसज्ज, सुखोई, मिग-29; अपाचेची उड्डाणे, सीमेजवळ लढाऊ विमाने सज्ज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीनंतर भारताने चीनला धडा शिकवण्यासाठी कसली कंबर

चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत (एलएसी) निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने या भागात लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. हवाईदलाने चीन सीमेवर गस्त घालणे सुरू केले असून सुखोई, मिग-२९ विमानांसह अपाचे हेलिकॉप्टर्स सीमेवर उडताना दिसली.

गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीनंतर भारताने चीनला धडा शिकवण्यासाठी कंबर कसली आहे. लढाऊ विमाने अगोदरच सीमेजवळ असलेल्या हवाई तळांवर सज्ज आहेत. सूत्रांनुसार, तिन्ही सेनादलांना कोणत्याही परिस्थितीशी निपटण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका स्क्वॉड्रन लीडरनुसार, सर्व हवाई तळांवर हवाईदल सज्ज असून कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याची तयारी आहे. ते म्हणाले, जवान नेहमीच उत्साही असतात. आकाशाला गवसणी घालण्यासाठी ते नेहमी तयार असतात.

गलवान येथील घटनेनंतर जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लडाखचा दौरा केला होता. त्यांनी विस्तारवादी मनोवृत्तीच्या चीनला त्या देशाचे नाव घेता चांगलेच बजावले. शिवाय, गलवान चकमकीत जखमी झालेल्या जवानांची भेट घेऊन देश आजवर कुणापुढे झुकला नाही, ना झुकेल, असे सांगितले होते.

अपाचे हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य

हे लढाऊ हेलिकॉप्टर अमेरिकी कंपनी बोइंगने तयार केलेले आहे. याचे एकूण वजन ६८३८ किलोग्रॅमच्या जवळपास असते. कमाल ताशी २७९ किमी वेगाने उड्डाण घेण्याची याची क्षमता आहे. यात दोन टर्बोशिफ्ट इंजिन असतात. यात हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, गन, रॉकेट वाहून नेण्याची क्षमता आहे. याची उंची सुमारे १५.२४ फूट असते आणि पंखांची लांबी १७.१५ फूट असते.

0