आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Border; Sikkim Ladakh Clash Update | India China Border Ladakh Galwan Valley Clash Latest Today News; Indian Amry Vs People's Liberation Army

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा जुंपली:सिक्कीममध्ये भिडले भारत-चीनचे सौनिक; चीनचे 20 तर भारताचे 4 जवान जखमी, चीनने घुसखोरीचा प्रयत्न केल्याने झाली हाणामारी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो सिक्कीममध्ये गतवर्षी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या वादाचा आहे. तो जून 2020 मध्ये समोर आला होता. - Divya Marathi
हा फोटो सिक्कीममध्ये गतवर्षी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या वादाचा आहे. तो जून 2020 मध्ये समोर आला होता.
  • 3 दिवसांपूर्वी सिक्कीमच्या नाकुला परिसरात झाली हाणामारी

भारत-चीन सीमेवर तणाव सुरू असताना पुन्हा सिक्कीम येथे दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडले. सूत्रांच्या माहितीनुसार, एलएसीवर चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही सैन्य गटांत हाणामारी सुरू झाली. भारतीय सैनिकांनी चीनच्या हाणामारीनंतर जोरदार प्रतिकार केला आणि चिनी सैनिकांना तेथून हकलून लावले. या धुमश्चक्रीत चीनचे 20 सैनिक जखमी झाले. तसेच 4 भारतीय जवान सुद्धा जखमी आहेत. ही घटना 3 दिवसांपूर्वी सिक्कीमच्या नाकुला परिसरात घडली. भारतीय लष्कराने मात्र यात कुणीही जखमी झाल्याचे अद्याप सांगितलेले नाही.

भारतीय लष्कराकडून सोमवारी यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, 20 जानेवारी 2021 रोजी नाकूला परिसरात दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले आणि किरकोळ हाणामारी सुद्धा झाली. त्यावेळी दोन्ही कमांडर्सनी निर्धारित प्रोटोकॉलनुसार हा वाद शमविला.

चीनने 17 दिवसांपूर्वी केली होती घुसखोरी
8 जानेवारी रोजी चीनच्या एका सैनिकाने भारतात घुसखोरी केल्यानंतर त्याला भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतले होते. ही घटना पूर्व लडाखच्या पेंगाँग त्सो सरोवर परिसरातील दक्षिण भागात घडली. तत्पूर्वी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या एका सैनिकाने भारतीय सीमेत घुसखोरी केली होती. ऑक्टोबरमध्ये सुद्धा डेमचोक सेक्टरमध्ये एका चिनी सैनिकाला ताब्यात घेण्यात आले होते. 21 ऑक्टोबर रोजी त्याला चुशूल-मॉल्डो मीटिंग पाइंटवर चिनी अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले. तो दोन दिवस भारतीय सैनिकांच्या ताब्यात होता.

एकीकडे चीनचे लष्करी अधिकारी मुत्सद्दी चर्चेचे ढोंग करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच लष्कराचे सैनिक भारतीय हद्दीत घुसखोरी करताना दिसून येतात. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू असताना रविवारीच 9 वी बैठक झाली. 15 तास झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी शांतता सुरळीत करणे आणि तणाव कमी करण्यावर भर दिला. तरीही एलएसीवर तणाव कमी करण्याची जबाबदारी आता चीनची आहे. वारंवार चर्चा करूनही चीनने आपली आश्वासने विसरल्याची उदाहरणे आहे. त्यात घुसखोरी त्याचाच एक प्रकार मानला जात आहे.