आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Border Tensions Jammu Kashmir Latest News Updates; China On Pakistan Based Terror Organisation Al Badr

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनचा कट:पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तानी दहशतवाद्यांना भेटले चिनी अधिकारी, जम्मू-काश्मीरात अस्थिरता आणण्याचा चिनी कट

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी म्यानमारच्या बंडखोरांचीही मदत करत आहे चीन

लडाखमध्ये भारत आणि चीनचा वाद सुरू असताना चीन पाकिस्तानी दहशतवाद्यांशी मिळून भारताला त्रास देण्याचे कटकारस्थान करत आहे. जम्मू आणि काश्मीरात हिंसाचार पसरवण्यासाठी आणि अराजकता माजण्यासाठी काश्मीरात पाकिस्तानची अल बद्र संघटना सक्रीय आहे. वृत्तसंस्था यूएनआयच्या रिपोर्टनुसार, चिनी अधिकाऱ्यांची पाकव्याप्त काश्मीरात नुकतीच अल बद्रच्या दहशतवाद्यांसोबत बैठक झाली. यामध्ये भारताला कसा त्रास देता येईल यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

म्यानमारच्या अराकन बंडखोरांना 95% वित्त पुरवठा चीनकडून

केवळ पाकिस्तानी दहशतवादीच नाही, तर म्यानमारच्या बंडखोर संघटनांना सुद्धा चीनने पोसल्याची उदाहरणे आहेत. म्यानमारच्या अराकन बंडखोर आर्मीला वित्त पुरवठ्यासह शस्त्र पुरवण्याचे काम सुद्धा चीनकडून केले जात आहे. बँकॉकच्या माध्यमाने दिलेल्या रिपोर्टनुसार, म्यानमारच्या अराकन बंडखोरांना होणाऱ्या वित्त पुरवठयापैकी 95% टक्के मदत एकट्या चीनकडून मिळते.

दक्षिण आशियात भारताला कमकुवत करण्याचे कटकारस्थान

बँकॉक माध्यमाच्या रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, चीन दक्षिण आशियात भारताला कमकुवत करण्यासाठी कट रचत आहे. पश्चिम म्यानमारचा भाग भारताच्या सीमेला लागून आहे. याच ठिकाणी चीन वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. भारत दक्षिण आशियामध्ये दुबळा कसा होईल यासाठीच चीनचे कारस्थान सुरू आहेत. म्यानमारमध्ये भारताचा प्रभाव वाढू नये असे चीनला वाटते.

भारत-चीन तणावात पाकिस्तान सक्रीय

न्यूज एजन्सी यूएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने सुद्धा पाकव्याप्त काश्मीर असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात 20 हजार सैनिकांची कुमक वाढवली आहे. भारत आणि चीनच्या वादाचा कसा गैरफायदा घेता येईल यावर पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानकडून वेळोवेळी शस्त्रसंधी उल्लंघन करत गोळीबाराच्या घटना सुद्धा वाढल्या आहेत. सोबतच, जम्मू आणि काश्मीरात पाकिस्तानी दहशतवाद्यांची घुसखोरी सुद्धा वाढल्याचे दिसून येत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser