आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Commander Level Talks Latest Update; After Nine Months Of Border Standoff In Eastern Ladakh; Withdrawal Of The Army From Gogra, Hot Spring And Depsang

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन:दोन्ही देशांमध्ये मॉल्डो येथे 10 व्या फेरीतील चर्चा सुरू; गोगरा, हॉट स्प्रींग आणि देप्सांग येथून सैन्याला मागे हटवण्यावर चर्चा

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक महिन्यापूर्वी झाली होती 9 व्या फेरीतील चर्चा

भारत-चीन लष्करी अधिका-यांची दहाव्या फेरीची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) सुरू असलेला तणाव संपवण्यावर चर्चा सुरू आहे. कमांडर लेव्हलच्या या संभाषणात, गोगरा, हॉट स्प्रिंग आणि डेप्सांगविषयी चर्चा होऊ शकते. चिनच्या साइडच्या मोल्दो भागात ही बैठक होत आहे.

आतापर्यंत 9 बैठकांमध्ये पूर्व लडाख आणि उत्तर आणि दक्षिण पँगॉन्ग परिसरातील डिसएंगेजमेंट विषयी चर्चा झाली होती. सैन्याच्या सूत्रांनुसार, डिसएंगेजमेंटनंतर दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या परमानंट पोस्टपर्यंत पोहोचल्या आहेत.

चिनी सैन्य करारानुसार माघार घेत आहे
पूर्व लडाखमधील पँगॉन्ग सरोवरावरुन चिनी सैन्य माघार घेत आहे. भारतीय लष्कराने मंगळवारी डिसएंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले. यात चिनी सैन्य आपले सामान घेऊन परतताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर चिनी सैन्याने या भागातून त्यांचे बंकर तोडले. तंबू, तोफ आणि गाड्या देखील काढून टाकण्यात आल्या आहेत. सुमारे 10 महिने चिनी सैन्याने यावर कब्जा केला होता.

एक महिन्यापूर्वी झाली होती 9 व्या फेरीतील चर्चा
भारत आणि चीन यांच्यात कोर कमांडर लेव्हलचे 9 वे संभाषण सुमारे एक महिन्यापूर्वी झाले होते. पूर्व लडाखमधील चुशुल सेक्टरसमोर मॉल्डो येथे ही बैठक झाली होती. या भागात दोन्ही सैन्यांमध्ये अनेक महिन्यांपासून तणाव होता. यावर तोडगा काढण्यासाठी 8 व्या फेरीतील चर्चेत कोणताही तोडगा निघाला नव्हता. 9 व्या बैठकीत डिसएंगेजमेंटवर सहमती झाली.