आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, तिबेटचे बौद्ध धम्मगुरू दलाई लामा आणि तवांग मठाच्या संतांची प्रतिक्रिया समोर आता समोर येत आहे.
दलाई लामा म्हणाले की, चीनमध्ये परतण्यात काही अर्थ नाही. त्यांना भारत आवडतो. त्याचवेळी तवांग मठाच्या संतांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, चीनने काळजी घ्यावी, हे 1962 नसून 2022 साल आहे, असे म्हणत त्यांनी एक प्रकारे इशारा दिला आहे.
हिमाचलच्या दौऱ्यात साधला संवाद, उद्या गया येथे जाणार
सोमवारी हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर दलाई लामा हे आले होते. तेव्हा त्यांना तवांग संघर्षाबाबत विचारण्यात आले. याप्रसंगी त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, तवांगमधील परिस्थिती सुधारत आहे. चीन, युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये अधिक चीन बदलता देश आहे.
परंतू चीनकडे परत जाण्यात अर्थ नाही. मला भारत खूप आवडतो. विशेष म्हणजे पंडित नेहरूंचे आवडते ठिकाण असलेले कांगडा हे ठिकाण माझे निवासस्थान आहे. दलाई लामा मंगळवारी गुरुग्राममधील सलवान एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेला भेट देणार आहेत. त्यानंतर बिहारमधील बौद्ध गया येथे जातील.
'देशात मोदी सरकार आहे, कुणालाही सोडणार नाही'
तवांगमधील यांगत्से सीमारेषेवर भारतीय-चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर बौद्ध मठाच्या लामांनी चीनला इशारा दिला आहे. लामा येशी खावो म्हणाले की, चीनने लक्षात ठेवावे की हे, 1962 साल नाही तर 2022 आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. तो कोणालाही सोडणार नाही. त्यांचा भारत सरकार आणि भारतीय लष्करांवर पूर्ण विश्वास आहे. ज्यामुळे तवांग सुरक्षित राहील.
लामा येशी म्हणाले- चीनची कृती चुकीची आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.