आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China: Coronavirus Vaccine Tracker Latest Updates; Covaxin Phase Three Trials In Gujarat, Pfizer, Chinese Biotec Group COVID Vaccine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीन ट्रॅकर:चीनी कंपनीने नियामकांना लसीच्या सार्वजनिक वापरासाठी मागितली परवानगी; एस्ट्राजेनेकाकडून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झाली 'चूक'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फायझरने ब्राझीलमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली

कोरोनाव्हायरसची प्रकरणे जगभरात 6 कोटींच्या पुढे गेली आहेत. त्याचबरोबर जगभरात लस मिळवण्याची तयारीही जोरात सुरू आहे. भारताप्रमाणेच अमेरिकेसह अनेक देशांनीही लस वितरण योजनेवर काम सुरू केले आहे. लस मंजूर होताच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान व्हॅक्सीनविषयी मोठे डेव्हलपमेंट झाले आहेत.

भारत बायोटेकच्या फेज-3 ट्रायल्स गुजरातमध्ये सुरू
भारत बायोटेकने गुजरातमध्ये कोव्हॅक्सीन या स्वदेशी लसीची फेज-3 चाचणी सुरू केली आहे. अहमदाबादमधील सोला सिव्हिल हॉस्पिटलला फेज -3 चाचणीच्या 130 केंद्रांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. गुजरातच्या अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाचे आयुक्त एच.जी. कोशिया म्हणाले की, लसीच्या चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी लवकरच सुरू होईल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या सहकार्याने हैदराबादस्थित भारत भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सीन विकसित केले आहे. फेज-3 ट्रायलपर्यंत पोहोचलेली ही भारतातील पहिली लस आहे.

एस्ट्राजेनेकाचे दोन रिजल्ट एका चुकीमुळे आले

अलीकडेच, ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेल्या व्हॅक्सीनच्या फेज -3 चा निकाल लागला होता. आता एस्ट्राजेनेकाने म्हटले की उत्पादनादरम्यान एक चूक झाली होती. या चुकांबद्दल कंपनीने सविस्तर माहिती दिली आहे. तसे, त्याने हे स्पष्ट केले नाही की काही स्वयंसेवकांना अर्धा डोस का दिला गेला? चांगली गोष्ट म्हणजे, ज्या वॉलेंटियर्सला अर्धा डोज देण्यात आला, त्यामधून 90% पर्यंत एफिकेसी आढळले. त्याच वेळी, ज्यांना दोन पूर्ण डोस देण्यात आले त्यांच्यातील एफिकेसी केवळ 62% राहिली.

चिनी कंपनीने मागितली व्हॅक्सीन बाजारात आणण्याची मंजूरी
चीनी लस तयार करणारी प्रमुख कंपनी चायना नॅशनल बायोटेक ग्रुप कंपनीने चिनी आरोग्य नियामकांकडून या लसीची विक्री करण्यास परवानगी मागितली आहे. शिन्हुआ फायनान्सने ही माहिती दिली. या अर्जामध्ये कंपनीच्या मध्य पूर्व आणि दक्षिण अमेरिकन देशांमध्ये घेण्यात आलेल्या फेज-3 मानवी चाचण्यांचे निकालदेखील सादर केले आहेत. तसे, कंपनीने अद्याप हे निकाल सार्वजनिक केले नाहीत, म्हणून इतर लसांशी तुलना केली जाऊ शकत नाही.

पाश्चात्य देशांमध्ये, फायझर आणि एस्ट्राजेनेका सध्या या लसीला मान्यता मिळवण्याच्या स्टेजवर आहेत. नियामकांनी त्यांना मान्यता दिलेली नाही. त्याचबरोबर CNBG आता आपली लस बाजारात आणण्यास परवानगी मागू लागली आहे. रशियाच्या बाहेरील सर्वसामान्यांना डोस उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवणारा हा पहिला लस विकसक ठरला आहे. तसे, त्याला तीन महिन्यांपूर्वी चीनमध्ये आपत्कालीन वापरास मान्यता मिळाली आहे.

फायझरने ब्राझीलमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली
अमेरिकेनंतर फाइजर इंक यांनी आता ब्राझीलमध्ये लस नोंदवण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. ब्राझीलच्या आरोग्य नियामकांसमोर कंपनीने आपल्या व्हॅक्सीनला मंजूरी देणअयासाठी अर्ज सादर केला आहे. कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की ब्राझीलमध्ये लस प्रदान करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. फायझरने जर्मनीच्या बायोएनटेकच्या सहकार्याने BNT162b2 लस तयार केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser