आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरसायबर धोका:युद्ध झाले तर भारतीय उपग्रह नष्ट करणार चीन, अमेरिकन दस्तऐवजांतून खुलासा; भारताची तयारी काय?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी मुंबईत अचानक वीजपुरवठा खंडित झाला. अनेक भाग अंधारात बुडाले. रुग्णालयांतील व्हेंटिलेटर चालवण्यासाठी आपत्कालीन जनरेटर चालवावे लागले. शेअर बाजारही बंद. हा गत काही दशकांतील सर्वात मोठा पॉवर आउटेज होता.

प्रत्यक्षात, हे कोणत्याही त्रुटीमुळे नव्हे, तर चीनी हॅकर्सच्या फौजेने पॉवर ग्रीड हॅक करून हे केले होते.

आता चीन 2 पावले पुढचा विचार करत आहे. युद्धाच्या स्थितीत चीन भारतासारख्या शत्रू देशांचे उपग्रहांवर नियंत्रण मिळवून ते नष्ट करण्याच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. अमेरिकेच्या लीक झालेल्या गुप्तहेर दस्तऐवजांतून हे उघड झाले आहे.

चला तर मग आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये पाहूया चीन सायबर युद्धाच्या माध्यमातून उपग्रहांवर नियंत्रण मिळवण्याचे काम कसे करत आहे? या संकटाचा सामना करण्यासाठी भारत किती तयार आहे?

चीनकडून भारत - अमेरिकेच्या हेरगिरीसाठी उपग्रहांचे प्रक्षेपण

अमेरिकेच्या लीक झालेल्या गुप्तहेर दस्तऐवजांनुसार, अमेरिकेच्या संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले की, चीनला लष्करी अंतराळ तंत्रज्ञान विकसित करण्यात मोठे यश मिळाले आहे. यात यामध्ये सॅटेलाइट कम्युनिकेशनचाही समावेश आहे.

अमेरिकेच्या स्पेस फोर्सचे प्रमुख बी. चान्स सॉल्टझमन यांनी काँग्रेस अर्थात अमेरिकन संसदेत सांगितले की, चीन आक्रमकपणे अवकाश क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

चीन उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक जॅमर, लेझर व शत्रू देशांच्या उपग्रहांना पाडणारे तंत्रज्ञान विकसित करत आहे. 2045 पर्यंत अंतराळातील सर्वात मोठी शक्ती बनण्याचे चीनचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.

चीनच्या लष्कराने आतापर्यंत 347 उपग्रह प्रक्षेपित केलेत. त्यापैकी 35 उपग्रह गत 6 महिन्यांत प्रक्षेपित करण्यात आलेत. या सर्व उपग्रहांद्वारे अमेरिका व भारतासह सर्व शत्रू देशांच्या सैन्यावर लक्ष ठेवणे हे चिनी लष्कराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

चीनने अँटी सॅटेलाइट रोबोटिक उपकरणही तयार केले आहे. हे उपकरण सक्रिय उपग्रहाचे नोजल बंद करून ते पूर्णतः नष्ट करू शकते. त्याच्या मदतीने चीन शत्रू देशाचा उपग्रहही आपल्या ताब्यात घेऊ शकतो.

शत्रू देशांच्या आरोग्यसेवा व संरक्षण औद्योगिक तळांना टार्गेट करणे

आपल्या सायबर अ‍ॅक्टिव्हिटीद्वारे चिनी सरकार सातत्याने आरोग्यसेवा, आर्थिक सेवा, संरक्षण औद्योगिक तळ, ऊर्जा, सरकारी सुविधा व शत्रू देशांच्या संवेदनशील उत्पादनांना लक्ष्य करत आहे.

CISA ने चीनच्या सायबर अ‍ॅक्टिव्हिटीविषयी एक सल्लाही जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, चीन कोरोनावर काम करणाऱ्या आरोग्यसेवा, औषधनिर्माण व संशोधन क्षेत्रातील संवेदनशील डेटा चोरण्याचा प्रयत्न करत आहे.

यूएस ऑफिस ऑफ नॅशनल इंटेलिजन्सच्या 2021 च्या वार्षिक धोका मूल्यांकनानुसार, चीनकडून यशस्वी व प्रभावी सायबर हेरगिरी हल्ल्याचा धोका कायम आहे. चीनकडे असे हल्ले करण्याची प्रभावी क्षमता आहे. त्यामुळे त्याचा मोठा धोका आहे.

1990 मध्ये चीनमध्ये सुरू झाली सायबर युद्धावर चर्चा

कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस अहवालात सायबर पॉलिसी इनिशिएटिव्हचे विजिटिंग स्कॉलर लिऊ जिन्हुआ म्हणतात की, चीनमध्ये सायबर युद्धाची शैक्षणिक चर्चा 1990 च्या दशकात सुरू झाली. त्याकाळी त्याला इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हटले जात होते.

अमेरिकी लष्कराने उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने आखाती युद्ध, कोसोवो, अफगाणिस्तान व इराकमध्ये मोठे यश मिळवले होते. चिनी सैन्याला याचा मोठा फटका बसला.

युद्धाचे स्वरूप बदलल्याशिवाय तो स्वत:चा पुरेसा बचाव करू शकत नाही हे त्या वेळी चीनच्या लक्षात आले. म्हणूनच युद्धात माहिती तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते.

1993 मध्ये आखाती युद्धाच्या 2 वर्षांनंतर चीनच्या लष्करी धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्थानिक युद्धे जिंकण्याचा मुद्दा विषद करण्यात आला. याचा अनुभव इतर देशांसोबतच्या युद्धात उपयोगी ठरेल असा त्यामागील हेतू होता.

2004 मध्ये इराक युद्धाच्या एका वर्षानंतर चीनी लष्करी धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा बदलण्यात आली. आता माहिती युद्धाअंतर्गत स्थानिक युद्ध जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.

2013 मध्ये पहिल्यांदाच चिनी सैन्याने सायबर युद्धाचा समावेश आपल्या रणनीतीमध्ये केला. त्याचा पहिला उल्लेख चीनच्या द सायन्स ऑफ मिलिटरी स्ट्रॅटेजीमध्ये आढळतो.

चीनचा भारतीय रेल्वे, वीज व महामार्ग नेटवर्कवर सायबर हल्ला

ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे फेलो समीर पाटील यांनी सांगितले की, मार्च 2021 मध्ये सिंगापूर कंपनी सायफार्माने दावा केला होता की, चीनच्या सरकारी सायबर हॅकर्सनी भारत बायोटेक व सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या 2 मोठ्या लस निर्मात्या कंपन्यांची वेबसाइट हॅक करून माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता.

6 एप्रिल 2022 रोजी एका अमेरिकन सायबर सुरक्षा फर्मने सांगितले होते की, चीन सरकारच्या सायबर हॅकर्सना लडाख पॉवर ग्रिडच्या कंट्रोल रूमची वेबसाइट हॅक करून ती नष्ट करायची आहे.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, चीनने भारताच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, महामार्ग, वीज, रेल्वे यासारख्या सुविधा हॅक करण्यासाठी आपल्या हेरांना हवे ते स्वातंत्र्य दिले आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईच्या पॉवर ग्रीडने काम करणे बंद केले. त्यामुळे मुंबई अंधारात बुडाली. चीनच्या सायबर हॅकर ग्रुपच्या 'रेडइको' कंपनीने भारतीय पॉवर ग्रीड हॅक केल्याचे नंतर स्पष्ट झाले.

त्याचवर्षी चीनमधील या हॅकर्सनी भारतातील 2 प्रमुख बंदरे व रेल्वे व्यवस्था हॅक करून देशाची वाहतूक व्यवस्था पूर्णतः अस्थिर करण्याचा प्रयत्न केला.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, चिनी हॅकर्सनी ऑक्टोबर 2020 मध्ये अवघ्या 5 दिवसांत भारताच्या पॉवर ग्रिड, आयटी कंपन्या व बँकिंग क्षेत्रांवर 40,300 वेळा सायबर हल्ले करण्याचा प्रयत्न केला.

गलवान चकमकीनंतर चीन हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता की, भारताने LAC वर काही कारवाई केली तर ते भारताच्या वेगवेगळ्या पॉवर ग्रिडवर मालवेअर हल्ला करून बंद पाडेल.

चीन विरोधात भारत किती तयार?

ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या फेलो श्रविष्ठा अजय कुमार यांनी सांगितले की, सायबर युद्धाच्या बाबतीत भारताचा जगातील तिसऱ्या श्रेणीतील देशांत समावेश होतो. याचा अर्थ सायबर युद्धाच्या आघाडीवर भारत आजही अत्यंत मागे आहे.

2019 मध्ये भारताचा सायबर हल्ल्यांनी सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये समावेश होता. त्यावेळी चीनने भारतावर 50 हजारांहून अधिक वेळा सायबर हल्ले केले होते.

सायबर युद्धाच्या आघाडीवर भारताला सायबर हल्ले टाळणे व सायबर हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे या दोन्ही आघाड्यांवर काम करावे लागेल.

विशेष म्हणजे कोणत्याही देशासोबत सायबर युद्ध झाल्याच्या स्थितीत भारताची तयारी अत्यंत नगण्य आहे. गेल्या 2 दशकांपासून चीन सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करत आहे. पण भारताने या क्षेत्रात नीट कामही सुरू केलेले नाही.

सायबर युद्धात कोणता देश किती बलवान आहे हे 3 गोष्टींवर अवलंबून असते...

1. देशाची डिजिटल अर्थव्यवस्था प्रणाली किती सुरक्षित आहे.

2. देशाची गुप्तचर व सुरक्षा यंत्रणा किती मजबूत आहे.

3. देशाच्या लष्करी मोहिमांमध्ये सायबर प्रणालीचा किती वापर होतो.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या नॅशनल सायबर पॉवर इंडेक्सनुसार, सायबर युद्धात चीन अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. याविषयी एखादा देश अमेरिका व चीनला टक्कर देत असेल तर तो रशिया आहे.

रशिया-युक्रेन युद्धापासून सायबर युद्ध किती महत्त्वाचे आहे ते समजून घ्या

24 फेब्रुवारी 2022 रोजी युद्ध सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी युक्रेनियन सैन्याच्या अनेक राउटरने अचानक काम करणे बंद केले. यामुळे युक्रेनियन सैन्यातील संवाद तुटला.

रशियाच्या या सायबर हल्ल्यात सॅटेलाइट इंटरनेट पुरवणारी अमेरिकन कंपनी व्हायसेटने काम करणे बंद केले. युक्रेनशिवाय पोलंड, इटली व जर्मनीमध्येही त्याचा परिणाम दिसून आला.

या देशांतील शेकडो पवनचक्क्या अनेक दिवस बंद होत्या. अनेक लोकांच्या सिस्टीम हॅक झाल्या. तसेच अनेक लोकांच्या सिस्टममध्ये व्हायरस अटॅकचे संदेश येऊ लागले.

रशियाप्रमाणेच चीनलाही सायबर हल्ल्याद्वारे उपग्रहातून शत्रूंच्या यंत्रणेपर्यंत पोहोचणारे सिग्नल थांबवायचे आहेत. याचे कारण म्हणजे सध्याच्या युगात युद्धातील माहिती महत्त्वाची भूमिका बजावते.

त्यामुळे ती रोखून चीनला आपल्या शत्रू देशांवर वर्चस्व गाजवायचे आहे. यासाठी चीन 2 पद्धती अवलंबतो-

1. शत्रूचे उपग्रह पूर्णतः नष्ट करणे.

2. त्यांचे सिग्नल हॅक करून शत्रू देशापर्यंत पोहोचण्यापासून रोखणे.

दिव्य मराठीचे खालील एक्सप्लेनर वाचा...

कायदा:बृजभूषण सिंहांवर 2 FIR, तत्काळ अटक करण्याचा नियम, मग विलंब का? 7 प्रश्नांत जाणून घ्या पुढे काय होणार

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर पॉक्सो कायदा व लैंगिक छळाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलीसह 7 महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे.

चला तर मग या आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये या प्रकरणाशी संबंधित 7 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया... येथे वाचा संपूर्ण बातमी...

हिटलरने आजच स्वतःला घातली होती गोळी; काही तास अगोदर प्रेयसीशी केले लग्न, सहकाऱ्यांना दिले विष

30 एप्रिल 1945, दुपारची वेळ... आता आपण युद्ध जिंकू शकणार नाही, हे जर्मन हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने बंकरमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या साथीदारांना विषाच्या बाटल्या दिल्या. हिटलरच्या आवडत्या कुत्रीवर विषाच्या प्राणघातकतेची चाचणी अगोदरच करण्यात आली होती.

हिटलर व त्याची पत्नी इव्हा ब्रॉन यांनी 3.30 वा. प्राशन केले. त्याचक्षणी, हिटलरने 7.65 मिमी बॅरलचे पिस्तूलातून स्वतःच्या उजव्या कानाजवळ डोक्यात गोळी झाडली. काही मिनिटांनी त्याचा खासगी सेवक हेन्झ लिंज खोलीत आला. त्याने दोन्ही मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून अन्य 2 नाझी पक्षाच्या सैनिकांच्या मदतीने चँसलर कार्यालयाच्या लॉनमध्ये नेऊन जाळून टाकले.

दोन्ही मृतदेह जाळण्यासाठी भरपूर पेट्रोल वापरण्यात आले. मृतदेहाचे उर्वरित अवशेष बंकरजवळील एका खड्ड्यात पुरण्यात आले. या घटनेला आज 78 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज त्या हिटलरचे किस्से, ज्याने लाखो ज्यूंची कत्तल करून स्वतःच्या मृत्यूसाठी आत्महत्येचा मार्ग निवडला… येथे वाचा संपूर्ण बातमी