आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सीमेवर तणाव कमी करण्याचा प्रयत्न:भारत-चीनदरम्यान लद्दाखच्या चुशूल सेक्टरमध्ये ले. जनरल लेव्हलची मीटिंग सुरू, 24 दिवसात दोन्ही देशांमध्ये तिसरी बैठक

लद्दाख3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 22 जूनच्या मीटिंगमध्ये भारताने पँगोंग त्सो परिसरातून चीनी सैनिकांना हटवण्याची मागणी केली होती
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांना फोन करतील, चीन मुद्द्यावर चर्चा होऊ शकते

भारत-चीनमधील तणाव कमी करण्यासाठी आज लेफ्टिनेंट जनरल लेव्हलच्या तिसऱ्या राउंडची बातचीत होत आहे. भारताकडून 14 कॉर्प्सचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल हरिंदर सिंग उपस्थित आहेत. ही मीटिंग लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) वरील चुशूल सेक्टरमध्ये भारतीय सीमेत होत आहे. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मीटिंगमध्ये पूर्व लद्दाखच्या विवादीत जागेवरुन सैनिक हटवण्याच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दोन्ही देशांमध्ये लेफ्टिनेंट जनरल लेव्हलची या महिन्यातील तिसरी आणि 15 जूनला गलवानमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतरची दुसरी मीटिंग आहे. मागील दोन मीटिंगमध्येही तणाव कमी करणे आणि सैनिकांना हटवण्यासंबंधी चर्चा झाली होती.

मागील दोन मीटिंगचे डिटेल्स

पहिली मीटिंग

केव्हा झाली: 6 जून

कुठे झाली: एलएसीवर चीनकडे मोल्डोमध्ये.

काय चर्चा झाली: शांतिपूर्ण पद्धतीने तणाव कमी करुन संबंध सुधारण्यावर चर्चा झाली. गलवान व्हॅलीकडे विविदीत जागेवरुन सैनिक हटवण्यावर सहमती झाली.

दुसरी मीटिंग

केव्हा झाली: 22 जून

कुठे झाली: एलएसीवर चीनकडे मोल्डोमध्ये.

काय चर्चा झाली: भारताने पूर्व लद्दाखच्या पँगोंग त्सो परिसरातून चीनी सैनिकांना हटवण्याची मागणी केली. गलवानमध्ये झालेल्या हिंसक चकमकीवर नाराजी व्यक्त केली. भारताने चीनसमोर मागणी ठेवली की, त्यांनी लद्दाखमधील आपल्या सैनिकांची संख्या कमी करावी.

पूर्व लद्दाखच्या देपसांगमध्ये घुसला चीन

चीन एकीकडून बातचीत करत आहे, दुसरीकडे घुसखोरी करत आहे. मागच्या आठवड्यात रिपोर्ट आली होती की, चीनी सैन्याने देपसांगमध्ये एलएसीवरुन 18 किमी आत भारतीय सीमेत घुसखोरी केली होती. सॅटेलाइट इमेजच्या हवाल्याने मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, चीनी सैन्याने भारतीय सीमेतील बॉटलनेकमध्ये घुसखोरी केली. हा परिसर रॅकी नाला आणि जीवान नाला नावाने ओळखला जातो. याच परिसरात 2013-14 मध्ये भारत-चीन समोरा-समोर आले होते.

राजनाथ सिंह अमेरिकी संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करतील

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेचे डिफेंस मिनिस्टर मार्क एस्पर यांना फोन करतील. यादरम्यान, चीनच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.