आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Galwan Valley Clash; Santosh Babu Awarded Mahavir Chakra On Republic Day

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्कराच्या शौर्य पुरस्कारांची घोषणा:गलवानमधील शहीद संतोष बाबूंना महावीरचक्र, चकमकीत हौतात्म्य पत्करणाऱ्या 5 जवानांना वीरचक्र

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांना महावीरचक्रने सन्मानित करण्यात आले आहे. संघर्षकाळात शहीद जवानांना दिला जाणारा महावीरचक्र हा परमवीर चक्रनंतरचा दुसरा मोठा सन्मान आहे. पाच जणांना कीर्तिचक्र, पाच जणांना वीरचक्र आणि सात जणांना शाैर्यचक्र मिळाले. गलवान खोऱ्यातच शहीद झालेले नायब सुभेदार नुदूराम सोरेन, हवालदार के. पलानी, नायक दीपक सिंह, शिपाई गुरतेज सिंग, हवालदार तेजेंदरसिंग यांना वीरचक्रने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी १५-१६ जूनच्या रात्री पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी व भारतीय सैनिकांत चकमक उडाली होती. यात भारताचे २० सैनिक शहीद, तर चीनचे ४० वर सैनिक ठार झाले होते.

दरम्यान, अग्निशमन पदकाने ७४ जवानांचा सन्मान होईल. ८ जणांना ‘राष्ट्रपतींचे फायर सर्व्हिस मेडल’ देण्यात येईल. २ जवानांना ‘फायर सर्व्हिस मेडल’ने सन्मानित केले जाईल. विशिष्ट सेवेसाठी १४ जवान, ‘फायर सर्व्हिस मेडल’ने ५० जवान सन्मानित केले जातील.

नांदेडच्या कामेश्वर वाघमारेला बालशाैर्य पुरस्कार
देशभरातील ३२ मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारे, तर क्रीडा पुरस्कारासाठी मुंबईच्या काम्या कार्तिकेयनची निवड झाली. संशोधन क्षेत्रातल्या पुरस्कारासाठी जळगावची अर्चिता पाटील, सोनित सिसोलेकर आणि नागपूरचा श्रीनभ अग्रवाल यांची निवड झाली. विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय आणि अपवादात्मक कामगिरीसाठी हे पुरस्कार देतात.

महाराष्ट्रातील ५७ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदके
महाराष्ट्रातील ५७ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर झाली. चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, १३ पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, तर ४० जणांना पोलिस पदक जाहीर झाले. अग्निशमन सेवेतील चौघांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली. ३ तुरुंग कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक मिळेल. ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ तिघांना मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...